घरमहाराष्ट्रAwhad On Ajit Pawar : आता त्यांनी नाव घ्यावे, 'एनसीपी- अलिबाबा चाळीस...

Awhad On Ajit Pawar : आता त्यांनी नाव घ्यावे, ‘एनसीपी- अलिबाबा चाळीस चोर’; आव्हाडांचा टोला

Subscribe

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला काल (6 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने विधिमंडळातील सदस्य संख्येवरुन पक्ष आणि चिन्ह बहाल केलं. त्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बहाल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: शरदचंद्र पवार असे नाव दिले आहे. हे नाव राज्यसभा निवडकीपुरते असून नंतर या नावात बदल होऊ शकतो. असे असतानाच आमदार जितेंद्र आव्हांडानी आता त्यांनी (अजित पवार गट) नाव घ्यावे, एनसीपी-अलिबाबा आणि चाळीस चोर अशा शब्दांत दादा गटाला टोला लगावला आहे. (Awhad On Ajit Pawar Now they should name NCP Alibaba Chalis Chor A bunch of challenges)

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला काल (6 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने विधिमंडळातील सदस्य संख्येवरुन पक्ष आणि चिन्ह बहाल केलं. त्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. दरम्यान आज शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार असे नाव दिले. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नावानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थ आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेला कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Legislative Council Election : विधान परिषदेच्या 21 जागा होणार रिक्त; जूनमध्ये 15 जागांसाठी निवडणूक?

- Advertisement -

‘या’ शब्दांत केला जितेंद्र आव्हाडांनी दादा गटावर हल्ला

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शरद पवार गटाला नाव दिल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X (ट्वीटर) वर पोस्ट करत दादा गटावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, अखेर सत्य सामोरे आलेच! निवडणूक आयोगानेही नाव देतानाही कळत न कळत हे दाखवून दिले की, राष्ट्रवादी (एनसीपी) ही शरद पवारांचीच आहे. म्हणून आम्हाला नाव मिळालं, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरद पवार’. हेच खरे जन्मदाते होते पक्षाचे. पण, काही पाकिटमारांनी घड्याळ चोरले. पण, त्यांच्या दुर्देवाने मनगट आमच्याकडेच राहिले. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेन. आता त्यांनी नाव घ्यावे, ‘एनसीपी- अलिबाबा आणि चाळीस चोर’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली आहे. तेव्हा या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -