घरमहाराष्ट्रChitra Wagh : फडणवीस यांच्यासारखा नेता एकीकडे आणि..., चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर...

Chitra Wagh : फडणवीस यांच्यासारखा नेता एकीकडे आणि…, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज, गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. गुहागर येथे झालेल्या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत, ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : हिंमत असेल तर द्या उत्तर, बावनकुळेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

- Advertisement -

कोकण माझ्या हक्काचे आहे. कोकणाचा आशीर्वाद घेऊन मी महाराष्ट्र फिरतो आहे. शिवसेनाप्रमुख कोकणात नतमस्तक झाले होते, असे सांगून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळात पंतप्रधान नरेंद्र मोदी इकडे फिरकले नाहीत. केंद्र सरकारने देखील मदत केली नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय निकषांच्या बाहेर जाऊन वादळग्रस्तांना मदत केली होती, अस उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

त्याला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूलथापांना कोकणी माणूस बळी पडणार नाही. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी कोकणाने अस्मानी संकटाचा कहर अनुभवला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना कोकणदौऱ्याच्या नावाखाली चिपी विमानतळावरच अधिकाऱ्यांना बोलावून दौऱ्याचे तोंडदेखले सोपस्कार पूर्ण केले होते. वादळाने चार तास थैमान घातले; पण उद्धव ठाकरे कोकणी जनतेला आधार देण्यासाठी तितकाही वेळ थांबले नाहीत, आल्या पावली मातोश्री गाठली, असे वाघ यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबावर टीका

त्याउलट, तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन दिवस कोकणात तळ ठोकून होते. वादळाने हैदोस घातलेल्या किनारपट्टीवरील गावांमध्ये तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करून नुकसानाचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारकडून सगळी मदत मिळवून दिली, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – Uddhav Thackeray : आमच्या हिंदुत्वात ओव्या पण तुमच्या हिंदुत्वात शिव्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -