घरमहाराष्ट्रRam Mandir Ayodhya : राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नाही तर रामाच्या नावावर...

Ram Mandir Ayodhya : राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नाही तर रामाच्या नावावर : संजय राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

मुंबई : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र देशातील काही नेत्यांना उद्घाटन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपावर आरोप करताना दिसत आहे. दरम्यान, काल (24 डिसेंबर) मीरा भाईंदर येथे गोवर्धन पूजा कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यादव सेवा संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संबोधित उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

फुटक दर्शन द्यायला रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का?, असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, हृदयात राम आणि हातात काम हे आमचं हिंदुत्व आहे. परंतु आता हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न होत आहे. या तानाशाहीला संपवून टाका. कारण महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. देशात दुसरे राज्य नाहीत का? आपल्या सोबत असणारे गुजराती परत जाणार का? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होणार, असं मोदी का म्हणतात? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का?, असे सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे, ते म्हणाले की, राम लल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल ते शिवसेनेने दिलं आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रूपये त्यावेळी दिले. त्या ठिकाणचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावरती नाह. रामल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मत मागतता. असे राऊत म्हणाले.

सध्या हल्ला काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या हल्लावर देखिल संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, पूछमध्ये हल्ला झाला त्यात 5 जवान शहीद झाले. आपले जवान सुरक्षित नाहीत, पोलिसांची हत्या होत आहे. काश्मीरमधील जी परिस्थिती सध्या दाखवली जाते तशी नाही हे मी मानतो. त्यामुळे काश्मीर सुधारलं हे कोणत्या आधारावर सरकार म्हणत आहे हा प्रश्न विचारणे बरोबर आहे का? असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -