घरताज्या घडामोडीसभागृहात बसलेत की जुगार अड्डयावर? बच्चू कडूंनी ठाकरेंच्या आमदारांना झापलं

सभागृहात बसलेत की जुगार अड्डयावर? बच्चू कडूंनी ठाकरेंच्या आमदारांना झापलं

Subscribe

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत बच्चू कडू शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होते. यावेळी विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार गटातील नेते सभागृहात गप्पा मारत होते. यावरून बच्चू कडू विधानसभेत संतप्त झाले. सभागृहात बसलेत की जुगार अड्डयावर? असा सवाल करत बच्चू कडूंनी ठाकरे गटाच्या आमदारांना झापलं.

तुम्ही शिवभोजन थाळीमध्ये भेदभाव कशासाठी करता? शहरातील लोकांना 50 रुपयांचं अनुदान असं बच्चू कडू म्हणाले. परंतु ठाकरे गटातील आमदारांच्या गप्पा सुरूच होत्या. अध्यक्ष महोदय यांना थांबवा जरा… कधीपासून इतकी मोठी चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे, जाधव, वायकर आणि शिवसेनेचे सर्व नेते आपांपसात चर्चा करत आहेत.

- Advertisement -

हे ज्या गोष्टींची चर्चा करताहेत त्यांचं माझ्यापर्यंत ऐकू येतंय. पण माझं बोलणं त्यांच्यांपर्यंत ऐकू जात नाहीये, असं वाटतं. तुम्ही सभागृहात आहात की सभागृहाच्या बाहेर बसला आहात? अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते बोलतच आहेत. त्यांच्यावर तुमचा प्रभावच पडत नाहीये. तुम्ही सांगा त्यांना असं काही बोलता येत नाही म्हणून… तुम्ही जुगाराच्या अड्ड्यावर बसला आहात का? हे आपसात बोलणं कसं काय शक्य आहे. एकतर तुम्ही-आम्ही तिकडे बसलो होतो. तेथून इकडे आणलं. असं करत-करत इकडे नेण्याचा तुमचा विचार आहे. मी चार वेळेस निवडून आलोय, असं म्हणत बच्चू कडू संतप्त झाले.

गरीब आणि अमीर तसं ग्रामीण आणि शहर यांच्यात भेदभाव केला जातोय. शिव भोजनची थाळी आणि 50 रुपये अनुदान शहरवाल्यांना आणि 40 रुपये ग्रामीणसाठी आहे. त्यांचं पोट नाही आहे का? प्रश्न दहा रुपयांचा नाहीये. तर प्रश्न मान-सन्मानाचा आहे. सरकारच्या या भूमिकेवर दादांनी लक्ष द्यावं. हा पैशांचा विषय नाही. पण अपमान करणारी गोष्ट आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : बारसूला विरोध करणारे संपूर्ण कोकणच देशद्रोही आहे का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -