घरक्राइमसुनीता धरनगरला जामीन; सतीश खरेचा मुक्काम तुरुंगातच

सुनीता धरनगरला जामीन; सतीश खरेचा मुक्काम तुरुंगातच

Subscribe

नाशिक : लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना सोमवारी (दि.१२) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तर, 30 लाखांची लाच घेणारा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. खरेच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. १४) सुनावणीची शक्यता आहे.

सतीश खरे याने दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांविरोधात सहकार विभागात दाखल दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी लाच घेतली होती. खरे २० मेपासून मध्यवर्ती कारागृहात आहे. सुनीता धनगर हिने निलंबित मुख्याध्यापकाच्या बाजूने न्यायाधिकरणाने निकाल दिल्यानंतर त्याला नियुक्ती देण्यासाठी शाळेला आदेशित करण्यासाठी ५० हजारांची लाच घेतली. याप्रकरणी धनगर आणि लिपिक नितीन जोशी मध्यवर्ती कारागृहात होते. यापैकी धनगरच्या जामीन अर्जावर सोमवारी (दि. १२) सुनावणी पूर्ण झाली. धनगरांकडे असलेली बेहिशेबी मालमत्ता आणि पैसे यांसह इतर पुराव्यांमुळे त्यांच्यावर अटी-शर्ती लागू झाल्या आहेत. तर, खरेच्या जामीन अर्जावरील सुनावणी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

यामुळे वाढला मुक्काम 

सतीश खरे याला लाच स्वीकारतान अटक झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील अनेक प्रकरणे समोर आली. माय महानगरनेही ‘खरेंचे खोटे कारनामे’ या मालिकेतून त्याचे अनेक प्रकरण बाहेर काढली. यासर्वाची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गंभीर दखल घेतली आणि या गंभीर भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी सुरू केली. त्याबाबतची कल्पना न्यायालयालाही दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयानेही अद्याप पर्यंत त्याची सुटका केलेली नाही.

काय होते प्रकरण 

सतीश खरेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवणारे तक्रारदार हे दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आले आहेत. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराने निवडीविरुद्ध हरकत घेतली होती. या हरकतीवर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे सुनावणी सुरु होती. तक्ररदाराने आपली बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. शैलेश सुमातीलाल साबद्रा यांच्याशी संपर्क साधला होता. तक्रारदाराने ३० हजार रुपये फीसुद्धा दिली होती. या प्रकरणाची सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खरे यांनी अ‍ॅड. साबद्रा यांच्यामार्फत ३० लाख रुपये लाचेची मागणी केली. अ‍ॅड. साबद्रा हे सतीश खरे आणि तक्रारदाराचे मध्यस्थी होते. त्यांनी दोघांकडे कमिशनची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदारास खरे यांनी बोलावून घेत अ‍ॅड. साबद्रा यांच्यामार्फत लाच न घेता स्वत:च लाच घेण्याची तयारी दर्शवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -