घरक्राइमअल्पवयीन मुलांच्या तस्करी प्रकरणी 'त्या' चार मौलांना न्यायालयीन कोठडी

अल्पवयीन मुलांच्या तस्करी प्रकरणी ‘त्या’ चार मौलांना न्यायालयीन कोठडी

Subscribe

नाशिक : बिहार येथून 59 मुलांना सांगली आणि पिंपरी चिंचवडच्या मदरशात घेऊन जाणार्‍या 4 मौलाना शिक्षकांना मनमाड रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना सोमवारी (दि.१२) मनमाड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चार संशयित आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आरोपींच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. मात्र, न्यायालयाने तो नामंजूर केला त्यामुळे या चौघांची रवानगी नाशिकच्य मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. आम्ही जामीनसाठी मालेगाव सत्र न्यायलयात करणार असल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. नियाज अहेमद लोधी यांनी दिली.

बिहार येथून 8 ते 18 वर्ष वयोगटातील 59 मुले आणि 4 शिक्षक (मौलाना) दानापूर एक्सप्रेसने सांगली आणि पिंपरीला जात होते. त्यांच्याकडे आरक्षित तिकीट देखील होते. मात्र. इतक्या मोठ्या संख्येने लहानमुले रेल्वेने का जात आहे, या मुलांची तस्करी तर केली जात नाही ना, असा संशय एका प्रवाशाला आल्यानंतर त्याने ट्वीटद्वारे रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली होती. माहिती मिळाल्या नंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळ आणि मनमाड आरपीएफशी संपर्क साधून त्यांना खात्री करण्यास सांगितले. त्यानुसार आरपीएफ जवानांनी भुसावळला 30 आणि मनमाडला 29 मुलांना ताब्यात घेऊन त्यांना रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. रेल्वे पोलिसांनी सर्व मुले आणि त्याच्या सोबत असलेले शिक्षक (मौलाना) यांची चौकशी केल्यानंतर मुलांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली होती. शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

दरम्यान, तपासासाठी रेल्वे पोलीस अधिकारी बिहारला गेले होते. तपास करताना या मुलांची तस्करी करण्यात आली नसल्याचे उघड झाले. आम्ही आमच्या मुलांना आमच्या मर्जीने चार मौलानासोबत पाठविले होते, असे या मुलांच्या पालकांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या शिक्षक मौलानाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सोमवारी त्यांना मनमाड न्यायलयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिल्यामुळे या संशयित आरोपींचा जामीन मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -