घरताज्या घडामोडीबाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून चिन्हासाठी 'हे' 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून चिन्हासाठी ‘हे’ 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून चिन्हासाठी तीन पर्याय सादर केले आहे. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून चिन्हासाठी तीन पर्याय सादर केले आहे. तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन पर्याय शिंदे गटाकडून देण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने चिन्हासाठी तीन पर्याय सुचवले असून, निवडणूक आयोगा कोणत्या चिन्हाला परवानगी देतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Balasahebanchi Shiv sena Shivsena Eknath Shinde Submit Election Symbol To Election Commission)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटाकडून चिन्हे सादर करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह सादर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दुसरे चिन्ह तुतारी फुंकणारा व्यक्ती आणि तिसरे चिन्ह शंख अशी चर्चा सध्या होत होती पण शिंदे गटाकडून तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर करण्यात आली आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे गटाकडून तीन चिन्ह सादर करण्यात आली होती. त्यामध्ये उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय दिले होते. त्यातील मशाल या चिन्हावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यानंतर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव ठाकरे गटाला देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने चिन्हासाठी सुचवलेल्या पर्यांयांपैकी कोणत्या चिन्हावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवाय, अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गट आपला उमेदवार उभा करणार की, भाजपाला पाठिंबा देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात आज पावसाची शक्यता तर पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -