घरमहाराष्ट्रनाशिकबम बम भोले...हर हर महादेव... लाखो भाविकांची ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा

बम बम भोले…हर हर महादेव… लाखो भाविकांची ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा

Subscribe

नाशिक : हर हर महादेव अन बम बम भोलेचा जयघोष करीत हजारो भाविकांनी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा मारत अन भगवान त्रयंबकराजाच्या दर्शनाचा लाभ घेत श्रावण महिन्याचे पुण्य पदरी पाडले. यावेळी प्रदक्षिणा मार्गावरील वेगवेगळया तीर्थांचे दर्शन करत निसर्गाचा आनंद घेतला. श्रावण महिन्यात तिसरया सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताची प्रदक्षिणा केली जाते. प्रदक्षिणा मार्गावर विविध असे छोटी छोटी तीर्थ असून, भाविकांनी या तीर्थांचेही दर्शन घेतले.

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जव्हार फाटा, महादेवी नाका, बाजार समितीजवळील जुना जव्हार फाटा, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक, कुशावर्त तीर्थ, तेली गल्ली आदी ठिकाणी बॅरिकेडस लावू वाहनांना बंदी करण्यात आली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने २५० हून अधिक बसेसचे नियोजन केले. मध्यरात्रीपासून भाविकांचे जथे प्रदक्षिणेसाठी रवाना झाले.

- Advertisement -

ब्रम्हगिरी प्रदक्षिणेनंतर भाविकांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. रविवारी सायंकाळपासूनच भाविकांनी प्रदक्षिणेचा रस्ता धरला होता. संपूर्ण रात्रभर ते सोमवार दुपारपर्यंत प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जातच होते. जवळपास एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. भाविकांची गर्दी पाहता संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर एक मानवी साखळी तयार झाली होती.

प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात आले. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 3 वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे याकरीता त्र्यंबक देवस्थानने व्यवस्था निर्माण करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभागाने पथके कार्यरत होती. आपत्कालीन सेवेसाठी रुग्णवाहिकेची सज्जता ठेवली गेली. पोलिसांनी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

- Advertisement -

पर्जन्ययागासाठी त्र्यंबक राजाला साकडे

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे. अनेक भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून तिसर्‍या श्रावणी सोमवार निमित्त रुद्राभिषेक व राज्यात दुष्काळाचे संकट येऊ नये व सगळीकडे सुजलाम सुफलाम व्हावे त्यासाठीत्र्यंबक राजाला प्रार्थना करण्यात आली. यावेळी विश्वस्त मनोज थेटे यांच्यासह सह 51 पुरोहितांनी हा रुद्राभिषेक व महापूजेचा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी यजमान म्हणून त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने, सचिव देवचक्के, विश्वस्त श्री कैलास घुले, दिपाली भुतडा. पुरुषोत्तम कडलग, स्वप्निल शेलार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -