Eco friendly bappa Competition
घर ठाणे यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार जल्लोष आणि थरांचा थरार; 'इतक्या' लाखांचे असणार बक्षीस

यंदा टेंभीनाक्यावर अनुभवयाला मिळणार जल्लोष आणि थरांचा थरार; ‘इतक्या’ लाखांचे असणार बक्षीस

Subscribe

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांनी ठाण्यात टेंभीनाका (Thane Tembhinaka) येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा गुरूवार 7 सप्टेंबर 2023 रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. (This year Tembhinaka will experience excitement and thrill of layers The reward will be so many lakhs)

मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. आनंद दिघे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. यंदा पुन्हा एकदा त्याच दिमाखात थरांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच जाहीर केलेली रोख स्वरुपात त्याच दिवशी देण्यात येणार आहे. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात जाते.

- Advertisement -

हेही वाचा – दहिहंडी, गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक; कायदा-सुव्यवस्था राखण्याचे सरकारकडून आवाहन

हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थराकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असून साहसी खेळही आहे. या खेळाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisement -

या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी 1 लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 12 हजार सहा थरांसाठी 8 हजार, पाच थरांसाठी 6 हजार तर, चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 5 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

हेही वाचा – मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज पूर्वनियोजीत, गृहमंत्र्यांचे षडयंत्र – माजी खासदाराचा आरोप

या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. तसेच टेंभीनाक्यावर येणाऱ्या गोविंदा पथकांसाठी दुपारच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे.

हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश वैती, ठाणे शहर संघटक अशोक वैती, शिवसेना ठाणे शहर विधानसभा प्रमुख हेमंत पवार, टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

- Advertisment -