घरमहाराष्ट्रDSK घोटाळा : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अटकेत

DSK घोटाळा : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अटकेत

Subscribe

डीएसके प्रकरणात आता बँक ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांसह सहा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अधिकारांचा गैरवापर करत अधिकाऱ्यांनी कर्ज वाटप केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी प्रकरणात आता बँक ऑफ महाराष्ट्र अधिकाऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. डीएसके यांना नियमांना डावलून कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हे आर्थिक शाखेने रवींद्र मराठे यांना अटक केली आहे. शिवाय डी. एस. कुलकर्णी यांच्या सीएला देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर, डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

कुणाकुणाला अटक?

आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, डी. एस. कुलकर्णी यांचे सीए सुनील घाटपांडे, अभियंता राजीव नवासकर यांना पुणे इथून अटक केली आहे. तर, बँकेचे माजी अध्यक्ष सुशील मुनहोत यांना जयपूर आणि बँकेचे विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अहमदाबाद इथून अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या अटकेने बँकेसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करत कर्ज मंजुर केल्याचा पोलिसांना अधिकाऱ्यांवर संशय आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीतून आणखीन बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

डी. एस. कुलकर्णी अटकेत

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांनी फेब्रुवारी २०१८मध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दिल्ली येथून त्यांना अटक केली होती. डीएसके आणि त्यांच्या पत्नी सध्या येरवडा कारागृहात आहेत. ड्रीम प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवल्यानंतर घराला घरपण देणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या साम्राज्याला घरघर लागली. शिवाय गुंतवणूकदारांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने त्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा लागला. कोर्टाने देखील डी. एस. कुलकर्णी यांना पैसे परत करण्याची ठरविक मुदत दिली. पण, गुतंवणूकदारांना पैसे परत करणे शक्य न झाल्याने अखेर डी. एस. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -