घरमहाराष्ट्रदिवाळीत चार दिवस बँका राहणार बंद!

दिवाळीत चार दिवस बँका राहणार बंद!

Subscribe

दिवाळीच्या दिवसात चार दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे आधीच थोडी कॅश काढून ठेवणे गरजेचे आहे.

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. आता दसरा संपला असून दिवाळी सारखा मोठा सण काही दिवासांवर येणार आला आहे. त्यामुळे या दिवसात बँका बंद राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला बँकेचे काही व्यवहार करायचे असतील तर लवकरात लवकर करुन घेणे गरजेचे आहे. कारण चार दिवस बँका बंद राहणार म्हटल्यावर कॅशचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

कधी आहेत बँका बंद ?

आरबीआयने संकेतस्थळावरुन दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळी असल्यामुळे ५ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होणार आहे. ५ तारखेला धनत्रयोदशी आहे. तर त्यानंतर ९ तारखेला भाऊबीज आहे. तर १० आणि ११ नोव्हेंबरला शनिवार, रविवार आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर बँका बंद राहणार आहे. तर महिन्याच्या शेवटी म्हणजे २३ नोव्हेंबरला ईद-ए- मिलाद आणि २४ नोव्हेंबरला गुरु तेग बहाद्दर शहीद दिवस असल्यामुळे देखील बँका बंद असणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा महिना हा बँकासाठी सुट्टीचा असणार आहे.

- Advertisement -

कॅश मिळणे कठीण

इतक्या दिवस बँका बंद असणार म्हटल्यावर त्याचा परिणाम कॅशवर देखील होणार आहे. कारण सणासुदीच्या दिवसात घरात कॅश लागते त्यामुळे आधीच थोडी कॅश काढून ठेवणे गरजेचे आहे.


वाचा – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘वसुली वर्ष’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -