घरमहाराष्ट्रभाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांना फायदा

भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांना फायदा

Subscribe

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत असून ग्राहकांनादेखील ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत असून ग्राहकांनादेखील ताजा भाजीपाला उपलब्ध होत आहे. ताज्या भाजीपाल्यासोबत फळ आणि दुधाचीदेखील विक्री या गटांद्वारे करण्यात येते. एका गटातील शेतकरी नियोजनाद्वारे वेगवेगळ्या भाजीपाल्याचे उत्पादन शेतात घेतात. शेताची कामे सांभाळून स्टॉल विक्रीसाठी मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येते. पळसे येथील दारणामाई शेतकरी गटातील प्रत्येकी तीन सदस्य श्रीरंग नगर, शंकर नगर आणि पाईपलाईन नगर येथील स्टॉलवर जबाबदरी सांभाळतात. इतर 9 सदस्य शेताची कामे सांभाळतात. दुसऱ्या दिवशी कामाची अदलाबदल होते. शेतकरी गटांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बऱ्याच ठिकाणी लोकप्रतिनिधीदेखील स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेत आहेत.

बचत गटांचे एकूण १२ विक्री केंद्र

‘आत्मा’तर्फे या शेतकरी बचत गटांची नोंदणी करण्यात येते. तसेच गटाच्या सदस्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण, सहलीद्वारे चांगल्या उपक्रमांची माहिती आदी सहकार्य करण्यात येते. शेतकरी बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रदर्शनांचे आयोजन करून नागरिकांपर्यंत थेट माल विक्रीची माहिती पोहोचविण्यात येते. नाशिकमध्ये सात बचत गटांचे एकूण १२ विक्री केंद्र असून दिवसाला १७ हजार किलो भाजीपाला विकला जातो. यात संजीवनी शेतकरी गट पळसे, जनार्दन शेतकरी गट मखमलाबाद, नचीकेता शेतकरी गट सोनगाव, दारणामाई शेतकरी गट पळसे, सद्गुरु गंगा शेतकरी गट मुंगसरा, उज्वल स्वयंसहाय्यता शेतकरी बचत गट पळसे, देवनदी फार्मर प्रोड्युसर कंपनी लोणारवाडी सिन्नर या गटांचा समावेश आहे.

- Advertisement -

नागरिकांचा विक्री केंद्राला चांगला प्रतिसाद

जिल्ह्यातील ९ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी गटामार्फत मुंबई आणि राज्यातील इतर भागात ३७ हजार किलो भाजीपाला दररोज विकला जातो. मुंबई येथील विधानभवन परिसरात संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडा बाजाराद्वारे १० हजार किलो भाजीपाल्याची विक्री होते. यात सात गटांचा सहभाग आहे. गोविंद गायके, शेतकरी पळसे- दारणामाई गटाद्वारे दिवसाला ३५ ते ४० हजाराचा शेतमाल विकला जात असून शेतमाल विक्रीची चिंता दूर झाली आहे. सदस्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले आहेत. नागरिकांचादेखील विक्री केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लिलाबाई पालवे, ग्राहक- थेट शेतमाल विक्री केंद्रामुळे घराजवळ शेतातील ताजा भाजीपाला आणि तोदेखील रास्त भावात मिळतो. भाजीपाल्याचे विविध प्रकारही उपलब्ध होतात. शिवाय गुणवत्ताही चांगली असते.


हेही वाचा – अकोला : कर्जपायी शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -