घरमहाराष्ट्रऑनलाइन कंपन्यांच्या विरोधात शुक्रवारी भारत बंद

ऑनलाइन कंपन्यांच्या विरोधात शुक्रवारी भारत बंद

Subscribe

त्यास भारतभरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील सर्व संस्थांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. विदेशी कंपन्यांना मुबलक आर्थिक बळ मिळत असून त्यांना केवळ २ ते ३४ व्याजदरावर व्यवसायाकरिता निधी उपलब्ध होत असतो. तसेच जगभरातील कोणत्याही भागातून ते स्वस्त दरात माल खरेदी करतात.

पुणे : किरकोळ व्यापार अस्थिर व उद्ध्वस्त करू शकणार्‍या वॉलमार्ट- फ्लिपकार्ट करार तसेच किरकोळ व्यापारात विदेशी गुंतवणूक यास विरोध करण्यासाठी शुक्रवार २८ सप्टेंबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली यांनी संपूर्ण भारत बंदचे आवाहन केले आहे.

त्यास भारतभरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात देखील सर्व संस्थांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. विदेशी कंपन्यांना मुबलक आर्थिक बळ मिळत असून त्यांना केवळ २ ते ३४ व्याजदरावर व्यवसायाकरिता निधी उपलब्ध होत असतो. तसेच जगभरातील कोणत्याही भागातून ते स्वस्त दरात माल खरेदी करतात.

- Advertisement -

भारतामध्ये कृषीनंतर सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणार्‍या किरकोळ व्यापार क्षेत्रास १० ते २० टक्के व्याजाने निधी उपलब्ध होतो. तसेच त्यांना भारतातून वस्तू जास्त दराने घ्याव्या लागतात. हा मोठा असमतोल आहे. त्यामुळे छोट्या दुकानदारांना व्यवसाय बंद करणे भाग पडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -