घरमुंबईकल्याण शीळ फाटयावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका !

कल्याण शीळ फाटयावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका !

Subscribe

या रुंदीकरणामध्ये जमीन हस्तांतराची प्रक्रिया सुरु असून, महापालिकेकडून सुमारे १९० कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हा रस्ता दोन्ही बाजूने ६० मीटर होणार असल्याने कल्याण शीळ फाटयावरील वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे.

ठाणे : दिवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणाला बुधवारपासून सुरूवात झाल्याने रस्त्याच्या आड येणार्‍या सहा इमारतींवर हातोडा पडणार आहे. या रुंदीकरणामध्ये जमीन हस्तांतराची प्रक्रिया सुरु असून, महापालिकेकडून सुमारे १९० कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हा रस्ता दोन्ही बाजूने ६० मीटर होणार असल्याने कल्याण शीळ फाटयावरील वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम थांबले होते. येत्या काही दिवसांत याठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात रस्ता रूंदीकरणाची कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

कौसा बायपास टोलनाका ते भारत गिअर कंपनी, दुवा अपार्टमेंट शिबलीनगर, वाय जंक्शन या रोडवरील ६ मोठ्या इमारती, 30 छोटी बांधकामे, भारत गिअर कंपनीचा काही भाग तसेच काही खाजगी जागेत ही कारवाई करण्यात आली.

सध्या हा रस्ता २५ ते ३० मीटरच्या आसपास आहे. परंतु रुंदीकरणानंतर हा रस्ता ६० मीटरचा होणार आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चार ते सात मजल्याच्या ६ इमारती, ३० बांधकामे, भारत गिअर कंपनीचा गेट, २० ते २५ गॅरेजवाले व इतर व्यावसायिक आदींवर यावेळी हातोडा टाकण्यात आला. तर या भागातील १९० कुटुंबांचे पुनर्वसनजवळील दोस्तीच्या रेंटल घरात केले जाणार आहे. रस्त्याचे रुंदीकरण जरी पालिका करणार असली तरी रस्त्याचे काम हे एमएमआरडीए मार्फतचे केले जाणार आहे.

- Advertisement -

वाय जंक्शन ते कल्याणफाटा हा सुमारे ४ किमीचा रस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्याच्या दुतर्फा वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. तसेच त्यामुळे संभाव्य वाहतुक कोंडी लक्षात घेऊन ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -