घरमहाराष्ट्रBhima-Koregaon : जामिनासाठी अर्ज केला, झाली पुन्हा अटक!

Bhima-Koregaon : जामिनासाठी अर्ज केला, झाली पुन्हा अटक!

Subscribe

भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नजर कैदेत ठेवलेल्या वर्नोन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

१ जानेवारी रोजी पुण्याच्या भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी नजर कैदेत ठेवलेल्या वर्नोन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या तिघांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, या तिघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप ठेवत पुणे पोलिसांनी या तिघांसह एकूण ५ जणांना अटक केली होती. यातील गौतम नवलखा यांची काही दिवसांपूर्वी सुटका करण्यात आली असून इतर ४ आरोपी अद्याप पोलिसांच्या नजर कैदेत आहेत.

उच्च न्यायालयात जाण्याआधीच अटक

विशेष न्यायाधीश के.डी.वढणे यांच्यासमोर या आरोपींच्या जामीन अर्जाची सुनावणी सुरू होती. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी या तिघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. या निर्णयाविरोधात आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्याआधीच विशेष न्यायाधिशांनी जामीन फेटाळल्यामुळे पुणे पोलिसांनी या तिघांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भीमा कोरेगाव प्रकरण: पुणे पोलिसांना कोर्टाचा पुन्हा झटका


काय होतं प्रकरण?

ऑगस्ट २०१८मध्ये कवी वरवरा राव, इ अॅण्ड पीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलखा, मानवी हक्क कार्यकर्त्या सुभाष भारद्वाज,वर्नोन गोन्साल्विस आणि अरूण फरेरा या ५ जणांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या पाचही जणांना पुढे न्यायालयाच्या आदेशांनुसार नजर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यातल्या गौतम नवलखांची सुटका करण्यात आली असून उर्वरीत ४ आरोपी अद्याप नजर कैदेत होते. यासंदर्भात जामीन मिळण्यासाठी या आरोपींनी कोर्टात अर्ज केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -