घरमहाराष्ट्रएमआयडीसी पोलिसांनी केली ३ पिस्तुल १२ जिवंत काडतुसे जप्त

एमआयडीसी पोलिसांनी केली ३ पिस्तुल १२ जिवंत काडतुसे जप्त

Subscribe

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात तब्बल १२ जिवंत काडतुसे आणि तीन देशी बनावटीचे पिस्तुल दोघांकडून जप्त करण्यात आले आहेत.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आठवड्यात तब्बल १२ जिवंत काडतुसे आणि तीन देशी बनावटीचे पिस्तुल दोघांकडून जप्त करण्यात आले आहेत. त्या दोघांना भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी परराज्यातील असून त्याच्याकडून ८ जिवंत काडतुसं आणि २ पिस्तुल जप्त केले आहेत. मोहन सुभाष कोळी (वय २१, रा. चाकण) आणि रामप्रसाद संतोष सोलंकी (वय १९, रा. मध्यप्रदेश) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोघांकडून एकूण १२ जीवनात काडतुसे आणि ३ देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहेत.

टोलनाक्याजवळ सापळा रचला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी मोहन सुभाष कोळी हा मोशी परिसरातील टोलनाक्याजवळ पिस्तुल विक्री करण्यास येणार असल्याची ठोस माहिती भोसरी एमआयडीसी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मोशी टोलनाक्याजवळ सापळा रचून मोहन सुभाष कोळी याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

- Advertisement -

एक परराज्यातील आरोपी 

आरोपी मोहन सुभाष कोळी यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पाच दिवसांनी परराज्यातील आरोपी रामप्रसाद संतोष सोलंकी हा पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्याला पोलिसांनी मोशी परिसरातून ताब्यात घेतले, त्यांच्याकडून एकूण २ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. परराज्यातून मोशी परिसरात कोणाला पिस्तुल विक्री करण्यासाठी आरोपी आला होता. याचा तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

झोन एकच्या पोलिसांची कामगिरी 

ही कामगिरी झोन एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेडगे, सहा-फौजदार सुरेश चौधरी, पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -