घरमहाराष्ट्रBHR घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत? खडसे पत्रकार परिषदेत कोणता बॉम्ब फोडणार

BHR घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत? खडसे पत्रकार परिषदेत कोणता बॉम्ब फोडणार

Subscribe

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जितेंद्र कंदारे आणि सुनील झंवर आर्थिक गुन्हेशाखेच्या रडावर आहेत. त्यापैकी सुनील झंवर यांच्या घरावर छापा मारला असता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे लेटर हेड आढळून आल्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळाले आहे. सुनील झंवर हे गिरीश महाजन यांचे उजवे हात समजले जातात. दरम्यान, गिरीश महाजन यांनी सुनील झंवर यांच्याशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. मात्र, आर्थिक गैरव्यवहाराशी काहीही संबंध नाहीत, असा खुलासा गिरीश महाजन यांनी केला आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार असून खडसे पत्रकार परिषदेत कोणता स्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बेनामी मालमत्तेच्या ठेवींप्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’शी निगडित जळगावात पाच ठिकाणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या १३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे उजवे उजवे हात समजले जाणारे सुनील झंवर यांच्या विविध फार्मवरदेखील छापे टाकल्याने ही कारवाई राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासून जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात तपासणी सुरु केली. याठिकाणी पोलिसांना महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड सापडल्याचे समजते. यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार असून खडसे पत्रकार परिषदेत कोणता बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण ‘तुमची ईडी तर आमची सीडी’ असा इशाराच खडसेंनी भाजप नेत्यांना पक्ष सोडताना दिला होता. त्यामुळे या सगळ्या कारवाईमागे खडसे असल्याची चर्चा असून, राज्य सरकारला भ्रष्टाचाराची कागदपत्रे पुरवून फडणवीस आणि महाजन यांना कोंडीत पकडत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -