घरक्राइमनागपुरच्या इतिहासात ऑनलाईन फसवणुकीची सर्वात मोठी घटना; आरोपीकडे सापडले कोटींचे घबाड

नागपुरच्या इतिहासात ऑनलाईन फसवणुकीची सर्वात मोठी घटना; आरोपीकडे सापडले कोटींचे घबाड

Subscribe

नागपूरमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाइन फ्रॉडची घटना उघडकीस आली आहे. एका व्यापाऱ्याला ऑनलाइन गेममध्ये तब्बल 58 कोटी रुपयांचा गंडा बसल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया येथे राहणाऱ्या आरोपीकडून ही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur Online Fraud : नागपूरमध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाइन फ्रॉडची घटना उघडकीस आली आहे. एका व्यापाऱ्याला ऑनलाइन गेममध्ये तब्बल 58 कोटी रुपयांचा गंडा बसल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया येथे राहणाऱ्या आरोपीकडून ही फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. अनंत जैन असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑनलाइन फ्रॉडची ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी अनंत जैन याच्या गोंदियातील घरी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरातून 18 कोटींची रोख रक्कम, 15 किलो सोने आणि 202 किलो चांदी सापडली आहे. सदर आरोपी हा क्रिकेट सट्टेबाज असल्याचे सांगण्यात आले आहे. (Biggest incident of online fraud in history of Nagpur)

हेही वाचा – इर्शाळवाडीत प्रशासनाकडून कलम 144 लागू, उपविभागीय अधिकाऱ्यांचा निर्णय

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. त्याची अनंत जैन नोव्हेंबर 2021 पासून फसवणूक करत होता. एका व्यवसायाच्या निमित्ताने हा व्यापारी आरोपीच्या संपर्कात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असल्याचे व्यापाऱ्याला सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला एक लिंक पाठवून त्यावर रम्मी, कॅसिनो आणि तीनपत्ती या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले. आधी व्यापाऱ्याकडून यासाठी नकार देण्यात आला होता. मात्र, आरोपीने जास्तच आग्रह केल्याने व्यापारी तयार हे ऑनलाइन गेम खेळण्यास तयार झाला. आरोपीने व्यापाऱ्याला ‘डायमंड एक्सचेंज डॉट कॉम’ नावाचे लिंक पाठवून त्याचे लॉगिन आणि पासवर्ड तयार करुन ऑनलाइन बेटिंग सुरू केले.

ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केल्यानंतर व्यापाऱ्याला बँक खात्यात आठ लाख रुपये जमा झाल्याचे दिसले. त्यानंतर व्यापारी जुगार खेळायला लागला. सुरुवातीला व्यापारी काही गेम जिंकला. पण अचानक तो तब्बल 58 कोटी रुपये हरला. पण दुसरीकडे अनंत जैन हा आरोपी सतत जिंकत असल्याने व्यापाऱ्याला त्याच्यावर संशय आला. व्यापाऱ्याने त्याच्याकडे पैसे परत मागितले. पण अनंतने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याशिवाय त्याला कुठे वाच्यता केल्यास अपहरण करून मारण्याचीही धमकी दिली. आरोपीने धमकी दिल्याने व्यापाऱ्याने त्याला आणखी 40 लाख रुपये दिले. यानंतर व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याने सायबर पोलिसांनी या प्रकरणी ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नागपूर गुन्हे शाखा आणि गोंदिया गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या गोदिंयातील घरी धाड टाकली. यावेळी आरोपीच्या घरातून जवळपास 18 कोटी रोख, 15 किलो सोने आणि 20 किलो चांदी जप्त करण्यात आली. आरोपी अनंत जैन हा गोंदियातील क्रिकेट सट्टेबाज असल्याचे समोर आले असून यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -