घरमहाराष्ट्रत्यांचा मुंबई महापालिकेतील पराभव ही काळ्या पाटीवरची सफेद रेष, आशिष शेलारांचा घणाघात

त्यांचा मुंबई महापालिकेतील पराभव ही काळ्या पाटीवरची सफेद रेष, आशिष शेलारांचा घणाघात

Subscribe

लोकशाहीला एक खतरा निर्माण झालाय. तो लोकशाहीचा खतरा दुसरा तिसरा कोणी नसून घराणेशाहीचा आहे. घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई लढायची आहे. मारक अशा पद्धतीनं घराणेशाही सुरू आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं सरकार होतं, तेव्हा प्रत्येक गरीब माणसाच्या स्वाभिमानाचा आणि विकासाचा विचार करणारं सरकार काम करत होतं, असंही आशिष शेलार म्हणालेत.

मुंबईः मुंबईत मंगल लोढांच्या नेतृत्वात घराणेशाहीला पराभूत करू, स्वतःकडेच येणारा रस्ता त्यांना माहीत आहे. अशा लोकांचा मुंबई महापालिकेतील पराभव हीसुद्धा काळ्या पाटीवरची सफेद रेष आहे, असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त BJP च्या मुंबई मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आशिष शेलार बोलत होते.

लोकशाहीला एक खतरा निर्माण झालाय. तो लोकशाहीचा खतरा दुसरा तिसरा कोणी नसून घराणेशाहीचा आहे. घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई लढायची आहे. मारक अशा पद्धतीनं घराणेशाही सुरू आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं सरकार होतं, तेव्हा प्रत्येक गरीब माणसाच्या स्वाभिमानाचा आणि विकासाचा विचार करणारं सरकार काम करत होतं, असंही आशिष शेलार म्हणालेत.

- Advertisement -

मुंबईत झोपडपट्टी विभागात राहणारा आमच्या बंधू भगिनी असतील, त्या प्रत्येकाला घर हे केवळ घोषणेपुरते नाही. 2011पर्यंत पुरावे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला घर देणारा आश्वासित करणारा कायदा या गरीब माणसासाठी देवेंद्र फडणवीसांनी केला. शेतकऱ्याला एक रुपयाही खर्च न करता ऑनलाईन पद्धतीनं सातबारा उपलब्ध करून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी युवक, महिला असतील, या सगळ्यांसाठी काम केलं आहे. पण आज पुन्हा एकदा घराणेशाही आणि विश्वासघाताने डोकं वर काढलेलं आहे. मोदींनी सांगितलेला घराणेशाहीविरुद्धचा लढा हा मुंबई आणि महाराष्ट्रातूनही आपल्याला सुरु करावा लागणार असल्याचं सांगत नाव न घेता त्यांनी शिवसेनेलाही सूचक इशारा दिलाय.

म्हणून मी नाहीतर माझा मुलगा, मी नाहीतर माझी मुलगी, कधी कधी पुतण्या असं वाटणारी सरकारं या राज्यामध्ये आहेत. घराणेशाहीविरुद्धचा संघर्ष ही लोकशाही टिकवण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त राज्य करण्यासाठी आणि गरिबाची सेवा करणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतलीय. विधानसभेतही ते आपण पाहिलं आहे. मुंबईत मंगल लोढांच्या नेतृत्वात घराणेशाहीला पराभूत करू, स्वतःकडेच येणारा रस्ता त्यांना माहीत आहे. अशा लोकांचा मुंबई महापालिकेतील पराभव हीसुद्धा काळ्या पाटीवरची सफेद रेष आहे, असंही ते म्हणालेत. सेवेचं व्रत, दुखी कष्टी माणसाची केलेली सेवा, विचारधारेप्रति असलेली आपली कमिटमेंट, प्रतिबद्धता या त्रिसूत्रीवर मोदींनी आपल्याला येत्या काळात पक्षाची वाढ कशी करता येईल, याबद्दल सांगितल्याचंही आशिष शेलारांनी अधोरेखित केलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -