विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला जळगाव येथे अपघात झाला आहे. जळगावजवळ महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला.
नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला.
स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत.
काळजी करण्यासारखे काहीही नाही.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2020
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर जळगाव दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्याचा दौरा आटोपून ते भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आज रात्री भालोद येथे निघाले होते. फडणवीसांच्या ताफ्यातील वाहन पुढील वाहनाला धडकले. या वाहनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बसलेले होते. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, ताफ्यातील दोन्ही वाहनांचं किरकोळ नुकसान झालं आहे. या अपघातानंतर प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीत बसून पुढील प्रवासाला निघाले.