घरमहाराष्ट्रBJP : मोदींना पुन्हा पंतप्रधान करणार; कपिल पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून...

BJP : मोदींना पुन्हा पंतप्रधान करणार; कपिल पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडून भावना व्यक्त

Subscribe

मुंबई : भाजपाने आज, बुधवारी सायंकाळी दुसरी यादी जाहीर केली. या यादीत एकूण 72 उमदेवारांची नावे असून त्यात महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली असून पीयूष गोयल, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मिहीर कोटेचा यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. तर पुण्यात भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि कपिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (BJP Make Modi Prime Minister again Sentiments from Kapil Patil and Muralidhar Mohol)

हेही वाचा – Politics : लोकसभा निवडणुकीपासून भाजपाच्या ‘या’ मंत्र्याने काढला पळ; मला यातून वाचवा, मुख्यमंत्र्यांना घातली गळ

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मला महापौर म्हणून, चार वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची पक्षाने संधी दिली. कार्यकर्तापासून ते लोकसभेचा उमेदवार हे केवळ भाजपामध्येच होऊ शकते. गिरीश बापट यांची आठवण येते आहे. त्यांनी 40 वर्ष काम करत असताना कार्यकर्ता म्हणून आम्हाला घडवले. मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक प्रकल्प पुण्यात केले गेले. शहराचा भविष्यातील व्हीजन समोर ठेवून काम करणार आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असे कपिल पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मला उमेदवारी मिळाली आहे. गेल्या 77 वर्षांपैकी मागील 10 वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी 35 हजार कोटी रुपयांची कामे झाली आहे. सध्याच्या घडीला अनेक कामे पूर्ण असून, काही प्रगतीपथावर आहेत. भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा सुनियोजित पद्धतीने विकासाबरोबरच चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे विश्वास कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Raigad Crime : बैलगाडा शर्यतीत शिंदे-भाजपा गटात राडा; एकाने काढली बंदूक

महाराष्ट्रातील भाजपा उमेदवारांची नावे 

  • नंदुरबार – डॉ. हीना गावित
  • धुळे – डॉ. सुभाष भामरे
  • जळगाव – स्मिता वाघ
  • रावेर – रक्षा खडसे
  • अकोला – अनुप धोत्रे
  • वर्धा – रामदास तडस
  • नागपूर – नितीन गडकरी
  • चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
  • नांदेड – प्रतापराव पाटील चिखलीकर
  • जालना – रावसाहेब दानवे
  • दिंडोरी – डॉ. भारती पवार
  • भिवंडी – कपिल पाटील
  • उत्तर मुंबई – पीयूष गोयल
  • ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा
  • पुणे – मुरलीधऱ मोहोळ
  • अहमदनगर – डॉ. सुजय विखे पाटील
  • बीड – पंकजा मुंडे
  • लातूर – सुधाकर श्रृंगारे
  • माढा – रणजीतसिंह नाईक निंबाळकर
  • सांगली – संजयकाका पाटील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -