घरमहाराष्ट्रPolitics : लोकसभा निवडणुकीपासून भाजपाच्या 'या' मंत्र्याने काढला पळ; मला यातून वाचवा,...

Politics : लोकसभा निवडणुकीपासून भाजपाच्या ‘या’ मंत्र्याने काढला पळ; मला यातून वाचवा, मुख्यमंत्र्यांना घातली गळ

Subscribe

चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादी कधीही जाहीर होऊ शकते. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं असण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास आपण अनुत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तुमचं वजन वापरा आणि लोकसभेत जाण्याच्या भीतीतून मला मुक्त करा, असं आवाहन त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. (Politics minister of BJP run away from the Lok Sabha elections Save me from this said the Chief Minister)

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मविआ की महायुती? शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेसाठी कोणता पर्याय निवडणार

- Advertisement -

चंद्रपुर येथील आयोजित कार्यक्रमात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नव्या संसदेच्या दरवाज्यासाठी वापरण्यात आलेलं लाकूड आम्ही इथूनच दिल्लीला पाठवलं. पण आत त्याच दारातून आत जावं लागतंय की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. परंतु त्या दारातून जाण्याची वेळ माझ्यावर येऊ नये, तशी गरज पडू नये. मुख्यमंत्री शिंदे तुमच्या अनुमतीनं राज्यगीत निवडलं. त्यात शब्द आहेत, दिल्लीचेही तख्य राखतो महाराष्ट्र माझा. पण आता दिल्लीला जाण्याचं बंधन माझ्यावर पडेल की काय याची भीती मला सध्या वाटते. मला या भीतीतून मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरा, अशी साद मुख्यमंत्र्यांना घालत सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास आपण अनुत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

लोकसभेच्या मैदानात उतरवून आपल्याला दिल्लीला पाठवलं जाईल अशी भीती राज्यातील भाजपाच्या बड्या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे अनेकांनी लोकसभेची धास्ती घेतली. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून निवडणूक लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे आहेत, पण त्यांना वर्ध्यातून संधी देण्याचा विचार केंद्रीय भाजपाकडून सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीची धास्ती घेतली आहे. तसेच लोकसभेत निवडून गेलो तर आपलं राज्यातील राजकारण संपेल अशी भीतीही भाजपाच्या काही नेत्यांना वाटते आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Baramati : सतत काय पवार…पवार…, आता स्वाभिमान जागा करून निवडणूक लढवणारच – विजय शिवतारे

भाजपाची दुसरी यादी लवकरच 

दरम्यान, भाजपाने 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 195 लोकसभा मतदारसंघांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक पार पडली. साधारणतः तीन तास झालेल्या या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे आता भाजपाची दुसरी यादीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच या यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यताही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -