घररायगडRaigad Crime : बैलगाडा शर्यतीत शिंदे-भाजपा गटात राडा; एकाने काढली बंदूक

Raigad Crime : बैलगाडा शर्यतीत शिंदे-भाजपा गटात राडा; एकाने काढली बंदूक

Subscribe

पनवेल : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गोळीबार करत गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर आता पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन गटात राडा झाला. त्यानंतर दगडफेक आणि गोळीबार झाल्याने शर्यती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे आता बैलगाडा शर्यती आयोजित करणारी समिती आणि पोलिसांनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. (Mumbai Crime Shinde-BJP team fights in bullock cart race One pulled out a gun)

हेही वाचा – Politics : लोकसभा निवडणुकीपासून भाजपाच्या ‘या’ मंत्र्याने काढला पळ; मला यातून वाचवा, मुख्यमंत्र्यांना घातली गळ

- Advertisement -

पनवेल येथील ओवाळा गावात आमदार हिंदकेसरी पनवेल-उरण आणि सरपंच हिंदकेसरी ओवळे 2024 या बॅनरखाली बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये दोन गटात अटीतटीची शर्यत झाली. एका गटाने शर्यत जिंकल्याने गुलाल उधळला. मात्र त्यानंतर राहूल पाटील आणि संदीप माळी यांच्या गटाकडून एकमेकांवर शेरेबाजी करण्यात आली. याचदरम्यान, एका गटाने राग मनात धरून हरलेल्या गटावर दगडफेक केली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या घनटेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये एका गटाकडून दुसऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहे, दगडफेक केली जात आहे. तसेच एक तरुण गोळी झाडत असल्याचे दिसून येत आहे. गोळीचा आवाज व्हिडीओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे. गोळीबार करणारा तरुण राहुल पाटील गटाच्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी ठोस पावले असून कारवाई करणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकरांचे ‘ते’ गंभीर आरोप काँग्रेसने फेटाळले

राहूल पाटील हा शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आहे, तर संदीप माळी हा भाजपाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. या दोन गटामध्ये म्हणजे सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आणि त्यानंतर एकाने बंदूक काढत गोळीबार केली. असे प्रकार सत्ताधारी पक्षाकडूनच होत असल्याने नागरिकांमध्ये या प्रकरणी चर्चा होताना दिसत आहे. राहूल पाटील यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. आमदार गणपत गायकवाड प्रकरणात पोलीस ठाण्यात राहूल पाटील याच्यावर गायकवाड यांनी गोळी झाडली होती. तसेच यापूर्वी बैलगाडा शर्यती दरम्यान पंढरी फडके आणि राहूल पाटील यांच्या वादानंतर गोळीबाराची घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -