घरमहाराष्ट्रभाजपचा मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव, म्हणून सोमय्या दिल्लीला जातात, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

भाजपचा मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव, म्हणून सोमय्या दिल्लीला जातात, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Subscribe

मुंबईतले काही धनिक, काही धनदांडगे आणि काही भाजपचे नेते, बिल्डर्स यांच्या संगनमताने किरीट सोमय्या हा नेतृत्व करतोय. आणि मुंबई केंद्रशासित कशी करता येईल, यासंदर्भातील एक प्रेझेंटेशन भाजपच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केलंय, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

मुंबई: किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात या लोकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलंय, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

संजय राऊत म्हणतात, ते दोन गोष्टींसाठी केंद्रात जातात. एक खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. दुसरं म्हणजे या किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात या लोकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलंय. मुंबईतले काही धनिक, काही धनदांडगे आणि काही भाजपचे नेते, बिल्डर्स यांच्या संगनमताने किरीट सोमय्या हा नेतृत्व करतोय. आणि मुंबई केंद्रशासित कशी करता येईल, यासंदर्भातील एक प्रेझेंटेशन भाजपच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केलंय, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

- Advertisement -

मुंबई वेगळी करून मुंबईवरती केंद्राचं राज्य आणायचं आहे

त्या सगळ्या चोर आणि लफंग्यांचं नेतृत्व किरीट सोमय्या करतोय. काही करून त्यांना मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे. मुंबई वेगळी करून मुंबईवरती केंद्राचं राज्य आणायचं आहे. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन घेऊन किरीट सोमय्या हा लफंगा, चोर, महाराष्ट्रद्रोही दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी गेलाय. महाराष्ट्रात मराठी सक्तीची असू नये यासाठी हा किरीट सोमय्या कोर्टात गेला होता. आता केंद्रात भाजपचं सरकार आल्यामुळे यांना बळ मिळालंय असल्याचंही संजय राऊत म्हणालेत.

फोन टॅपिंग करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न

तसेच त्यांना रश्मी शुक्ला फोन टॅपिंगसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मी परवाच राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शाहांना एक प्रश्न विचारला, की केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करत नाहीत का? आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत नाही काय? हे आमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही सांगा. त्याच्यावर अमित शाह म्हणाले मी डोळ्यात डोळे घालून बोलायला तयार आहे. तेव्हाही मी आमचे फोन टॅपिंग कसे झाले हा मुद्दा मांडला. रश्मी शुक्ला या बाईसाहेब तेव्हा कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होत्या हे आपल्याला माहीत आहे. आजही त्या केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे आमचे फोन टॅपिंग करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला आमचे फोन ऐकण्यात आले. हे सरकार आम्ही बनवत होतो. त्या काळातल्या या सर्व घडामोडी आहेत. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या सुरक्षेचा विषय होता. तरीही केंद्र सरकारच्या मदतीनं आमचे फोन टॅप झाले. एखाद्या स्टेटमेंटसाठी मला बोलावणार असतील तर पोलिसांसमोर किंवा तपास यंत्रणांसमोर जायला माझी काही हरकत नाही, असंही संजय राऊतांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

किरीट सोमय्या देशद्रोही, देशाच्या नावावर चोरी केलीय

उल्टा चोर कोतवालको दाटे म्हणत 58 कोटींचा हिशेब किरीट सोमय्यांनी द्यावा, सेव्ह विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केले की नाही?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवताय. भाजप भ्रष्टाचाराचं समर्थन करतं हे समजू शकतो, पण देशद्रोह्याच्या समर्थन करू नये. किरीट सोमय्या देशद्रोही, देशाच्या नावावर चोरी केलीय, असंही ते म्हणालेत.


हेही वाचाः संजय राऊतांनंतर पुढचा नंबर ‘या’ मंत्र्याचा, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -