घरमनोरंजनVideo : 'The Kashmir Files' च्या यशानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी रिलीज केला...

Video : ‘The Kashmir Files’ च्या यशानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी रिलीज केला ‘The Untold Kashmir Files’

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येवर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या यशानंतर आता जम्मू काश्मीर पोलिसांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. दहशतवादामुळे सर्व काश्मीरींना मग ते कोणत्याही धर्माचे का असोत, त्यांना कशाप्रकारे मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते ते या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

57 सेकंदांचा हा व्हिडीओ असून ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल्स’ असे त्या व्हिडीओचे टायटल आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये काश्मीरमधील दहशतवादाच्या कालखंडाचे चित्रण करणारी अनेक दृश्ये आहेत. तर मागे फैज अहमद फैज यांची ‘हम देखेंगे’ ही कविता ऐकू येतेय जी ‘द काश्मीर फाइल्स’मध्येही वापरली गेली आहे.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, ‘दहशतवादी एसपीओ इश्फाक अहमद यांच्या घरात घुसले आणि त्यांचा भाऊ उमर जानसह त्यांची हत्या केली. शांततेचे समर्थन करणारे असे अनेक काश्मिरी मारले गेले.

- Advertisement -

आणखी एका फ्रेममध्ये लिहिले आहे की, “काश्मीरमध्ये लक्ष्य करून 20 हजार लोक मारले गेले. त्यामुळे आवाज उठवण्याची वेळ आली आहे. तर शेवटी ‘आम्ही काश्मीर आहोत, आम्ही बघू घेऊ’ असे लिहिले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी 31 मार्च रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ जारी केला, जो आतापर्यंत 1.66 लाख लोकांनी पाहिला आहे.

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रित करणाऱ्या करण्यात आले आहे. विवेकने स्वतः या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून 1990 मधील वेदनादायक दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार असे स्टार्स दिसले आहेत. आत्तापर्यंत हा चित्रपट गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये करमुक्त झाला आहे. मात्र या करमुक्तीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले.


The Kashmir Files : काश्मीरी पंडितांना चित्रपटाची नाही तर पुनर्वसनाची गरज, द काश्मीर फाईल्सवरून केजरीवालांनी सुनावले


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -