घरमहाराष्ट्रपेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थी पाळणार 'काळा दिवस'

पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थी पाळणार ‘काळा दिवस’

Subscribe

महाविद्यालयाचे विश्वस्त प्रभाकर देसाई हे कोणतीच दाद देत नसल्याने त्यांना भिकारी पुरस्कार देण्याचा प्रयत्न विद्यार्थी संघटनेने केला.

डोंबिवली शहरातील के व्ही पेंढारकर महाविद्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थी भारतीने केलेल्या आंदोलनानंतर कोणतीच कारवाई न झाल्याने त्या निषेधार्थ मंगळवार ५ मार्च रोजी महाविद्यालयात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या संदर्भात विद्यार्थी भारतीने राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि कुलगुरू यांच्याकडेही तक्रार केली, अशी माहिती विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली आहे.

पेंढरकर महाविद्यालयाच्या वाढीव फी आणि भोंगळ कारभाराविरोधात अनेक दिवसांपासून विद्यार्थी भारती संघटनेचा महाविद्यालय प्रशासनाबरेाबर लढा सुरू आहे. प्रत्येक शैक्षणिक कामकाजामागे अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. ती रद्द करून परत करावी या मागणीसाठी मागील आठवडयात विद्यार्थी भारतीच्या कार्यकत्यांनी महाविद्यालया बाहेर निदर्शने केली.

- Advertisement -

तसेच महाविद्यालयाचे विश्वस्त प्रभाकर देसाई हे कोणतीच दाद देत नसल्याने त्यांना भिकारी पुरस्कार देण्याचा प्रयत्न विद्यार्थी संघटनेने केला. मात्र महाविद्यालयाच्या गेट बाहेरच विद्यार्थांना अडवून ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांनतर सोडून दिले. मात्र आठ दिवस होऊनही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतलेली नसल्याने अथवा कोणताच अहवाल संघटनेला मिळालेला नाही. त्यामुळे, काळा दिवस पाळण्याचे विद्यार्थी भारतीने ठरवले असल्याचे कार्यवाह श्रेया निकाळजे यांनी सांगितले. यासंदर्भात विद्यार्थी भारतीने राज्यपाल मुख्यमंत्री आणि कुलगुरू यांच्याकडे न्यायासाठी साकडं घातलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -