घरदेश-विदेशसहा वर्षीय ब्रिटिश मुलीची पाकिस्तानातील तुरुंगातून केली सुटका

सहा वर्षीय ब्रिटिश मुलीची पाकिस्तानातील तुरुंगातून केली सुटका

Subscribe

पाकिस्तानातील तुरुंगामध्ये ब्रिटिश महिला कैदीच्या सहावर्षीय मुलीला आपल्या देशात जाण्याची परवानगी दिली आहे. मुळ ब्रिटनची असलेली ही महिला पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत आहे.

पाकिस्तानातील तुरुंगामध्ये सहा वर्ष काढल्यानंतर अखेर एका चिमुरडीला तिच्या देशात जाण्याची परवानगी पाकिस्तानी सरकारने दिली आहे. या चिमुरडीच्या आई विरोधात हिरोइन तस्करीचा गुन्हा नोंदवला होता. खादीजा शाह (३२) असे या महिलेचे नाव असून ती मूळ बर्मिंगहॅम येथील रहिवाशी आहे. २०१२ मध्ये इस्लामाबाद येथील विमानतळावर तिला हिरोइन तस्करीच्या गुन्ह्या नोंदवण्यात आला होता. २०१४ मध्ये या महिलेला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. खादीजा जवळून ६३ किलो हिरोइन आढळून आली होती. शिक्षा झाली तेव्हा खादीजा गरोदर होती. खादीजाने पाकिस्तानी तुरुंगातच मुलीला जन्म दिला होता. यामुलीला तरुंगातच वाढवण्यात आले. सहा वर्षांनंतर या चिमुरडीला सोडण्याचा निर्णयावर पाकिस्तान सरकारने शिक्कामोर्तब केली आहे. मात्र खादीजाला तुरुंगातच रहावे लागणार आहे.

“आमचे कर्मचारी या महिलेची सतत काळजी घेत होते. त्यांची मुलगी मूळ देशात परतावी म्हणून आम्ही त्या चिमुरडीला परत पाठवले आहे. या चिमुरडीला युकेमध्ये पाठवण्यात आले आहे. तीच्या आईला अटक केली असल्यामुळे तिला सोडता येत नाही.” – पाकिस्तानी अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -