घरताज्या घडामोडीउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा महापालिकेकडून मंजूर

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा महापालिकेकडून मंजूर

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याचा राजीनामा महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याचा राजीनामा महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामी अखेर मंजूर करण्यात आला. (Bmc Office Resignation of Rutuja Latke Confirm shiv sena uddhav balasaheb thackeray mumbai high court)

मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केल्याचे पत्र तयार केल्याचे समजते. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अंधेरी पोट निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा एक महिन्यापूर्वीच दिला होता. विशेष म्हणजे त्या तेव्हापासून नोकरीवरही हजर नाहीत. तरी देखील त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता.

12 ऑक्टोबर 2020 रोजी ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही, असे महापालिकेच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचा राजीनामा मंजूर करणार आहात का, ते स्पष्ट करा असे सांगत चांगलेच फटकारले होते. याशिवाय, मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीच्यावेळी लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारवा आणि तसे पत्र द्यावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आज सकाळीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मंजूर केला.

- Advertisement -

हेही वाचा – पुढील वर्षी अर्थव्यवस्थेत 7 टक्क्यांनी वाढ तसेच महागाईही नियंत्रणात राहील; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -