घरअर्थजगतपुढील वर्षी अर्थव्यवस्थेत 7 टक्क्यांनी वाढ तसेच महागाईही नियंत्रणात राहील; अर्थमंत्री निर्मला...

पुढील वर्षी अर्थव्यवस्थेत 7 टक्क्यांनी वाढ तसेच महागाईही नियंत्रणात राहील; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा

Subscribe

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत 0.60 टक्केंची कपात दाखवली आहे. त्यानुसारच पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जीडीपीची वाढ 6.8 टक्के एवढी असेल असेही सांगण्यात आले आहे.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत 2023 मध्ये 7 टक्क्यांनी वाढ होईल त्याच सोबत पुढील अर्थसंकल्प तयार करताना अर्थव्यवस्थेची वाढसुद्धा कायम राहून वाढती महागाई कशी नियंत्रणात राहील याची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मलला सीतारामन म्हणाल्या. ( 7 percent growth in the economy in 2023; Statement by Union Finance Minister Nirmala Sitharaman )

हे ही वाचा – करवा चौथच्या दिवशी देशभरात तब्बल 300 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची विक्री

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपला वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक रिपोर्ट नुकताच सादर केला आहे. त्या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे हे विधान अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. दरम्यान या अहवालामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत घट दाखवण्यात आली आहे.

हे ही वाचा – फळे-भाज्यांच्या किमती कडाडल्या; महागाईच्या दरात ०.४१ टक्क्यांनी वाढ

- Advertisement -

दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीत 0.60 टक्केंची कपात दाखवली आहे. त्यानुसारच पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जीडीपीची वाढ 6.8 टक्के एवढी असेल असेही सांगण्यात आले आहे. याआधी ही वाढ 7.4 टक्के असेल असे सांगण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पुढील केंद्रीय अर्थसंकल्प बनवताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सोबतच त्यात अर्थव्यवस्थेच्या वाढीत गती कशी कायम राहील हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे. असंही आरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

हे ही वाचा – सहा महिन्यांत 8.98 लाख कोटींचे प्रत्यक्ष करसंकलन, 23.8 टक्क्यांची वाढ

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -