घरमहाराष्ट्रधक्कादायक: नळदुर्ग किल्ल्यात बोट बुडाली; तीन पर्यटकांचा मृत्यू

धक्कादायक: नळदुर्ग किल्ल्यात बोट बुडाली; तीन पर्यटकांचा मृत्यू

Subscribe

बोटिंग करत असताना अचानक बोट बुडाली. या बोटीमध्ये ८ पर्यटक होते. यामधील ५ पर्यंटकांना वाचण्यात यश आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. नळदुर्ग किल्ल्यावर असलेल्या तलावात बोट उलटली. या दुर्घटनेत तीन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोटिंग करत असताना अचानक बोट बुडाली. या बोटीमध्ये ८ पर्यटक होते. यामधील ५ पर्यंटकांना वाचण्यात यश आले आहे. तर तीन पर्यटकांचा शोध सुरु आहे. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली आहे.

नळदुर्ग किल्ल्यावरील तलावात बोटिंग करत असताना तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलीआणि एका मुलाचा समावेश आहे. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. सानिया फारुख काझी, इंजान एहेसान काजी, अलमा जहागीरदार अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण नळदुर्ग येथे राहणारे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -