घरताज्या घडामोडीBig News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचे Election...

Big News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, हायकोर्टाचे Election Commission ला निर्देश

Subscribe

Pune Bypoll Election : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाने गेल्या 10 महिन्यात कोणतीच हलचाल केली नाही, यावरुन मुबंई उच्च न्यायालयाने आयोगाची खरडपट्टी काढली आहे. एवढे महिने लोकसभेची जागा रिक्त ठेवणे योग्य नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने आयोगाला लवकरात लवकर पोट निवडणूक घेण्याचे निर्देश  दिले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha constituency) भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish bapat) यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. त्यानंतर सहा महिन्यात तिथे पोटनिवडणूक होणे गरजेचे होते. मात्र आयोगाने अजुनही निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावेळी आयोगाने 2024 सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमावर याचा परिणाम होईल अशी सबब पुढे केली होती. त्यावर न्यायालयाने आयोगाला झापले. निवडणुका घेणे हे आयोगाचे काम आहे, ते त्यांनी वेळेत पूर्ण केले पाहिजे, त्यासाठी कोणतीही सबब सांगू नये असे न्यायालयाने आयोगाला खडसावले.

- Advertisement -

बापटांच्या निधानंतर चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. पुणे आणि चंद्रपूर या दोन्ही मतदारसंघात आयोगाने अद्याप निवडणूक घेतलेली नाही. या दोन्ही लोकसभेच्या जागा अजून रिक्त आहेत. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपत आहे. मात्र तरीही महाराष्ट्रातील लोकसभेच्या दोन जागांवर आयोगाने निवडणूक जाहीर केलेली नाही.

पुणे लोकसभेसाठी इच्छूकांची भाऊगर्दी

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी इच्छूकांची मोठी रांग आहे. भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या या जागेवर बापटांची सून स्वरदा बापट यांच्यासह पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी अशी इच्छूकांची मोठी यादी आहे. यातून उमेदवाराची निवड करणे भाजपसाठी जिकरीचे काम आहे. भाजपने पारंपरिक कसबा मतदारसंघ गमावला आहे. येथे काँग्रेसचे रवी धनगेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपला कोण उमेदवार द्यावा हा मोठा प्रश्न आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Pune Lok Sabha : काँग्रेसचे दोन नेते मैदानात; एकाचे भावी खासदार म्हणून बॅनर्स तर, दुसरा म्हणतो…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -