घरमहाराष्ट्रWinter Session : विधानसभेत भुजबळांचा खळबळजनक दावा, म्हणाले - "मला गोळी मारली...

Winter Session : विधानसभेत भुजबळांचा खळबळजनक दावा, म्हणाले – “मला गोळी मारली जाऊ शकते…”

Subscribe

नागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विशेष प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावावर काल (ता. 12 डिसेंबर) चर्चा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आज (ता. 13 डिसेंबर) पुन्हा या प्रस्तावावर भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याद्वारे चर्चेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर आपले मत व्यक्त केले. परंतु, त्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणामुळे खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत बोलताना “मला गोळी मारली जाऊ शकते…”, असा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा रंगल्या आहेत. (Winter Session : Chhagan Bhujbal’s sensational claim in the Legislative Assembly)

हेही वाचा – Winter Session : विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विशेष उपाययोजना करा, वडेट्टीवारांची मागणी

- Advertisement -

विधानसभेत मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, भुजबळ मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा तयार केली जात आहे. मला सर्वच समाज समान आहे. भुजबळ हा मराठा विरोधक म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे. मराठा आरक्षणाचा कायदा दोन वेळा आणण्यात आला, त्याला मी पाठिंबा दिला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असे सर्वजण बोलतात, मात्र मग भुजबळच टार्गेट का? असा प्रश्न भुजबळांकडून उपस्थित करण्यात आला. तर, सारथीला सर्व ठिकाणी कार्यालय दिले त्यासाठी 1 रुपया चौरस फुटाप्रमाणे भाडे आकारले, मग ओबीसींसाठी महाज्योतीला 28 कोटी भरायला सांगितले, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी सभागृहात दिली.

तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्ती केलेल्या जागांमध्ये 75 टक्के मराठा समाजाचे विद्यार्थी असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1 हजार कोटी रुपयांचा निधी आहे तर ओबीसी महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या तरुणांना जे देता, ते ओबीसी समाजाला द्या एवढच तर आमचे म्हणणे आहे. तर, सरकारी नोकरीमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आहे, प्रतिनिधीत्व मात्र 9.50 टक्के आहे, ते आरक्षण आम्हाला द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांना गोळी मारण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मी आता त्याचा कार्यक्रम करतो असं मनोज जरांगे म्हणतात. म्हणजे माझा कार्यक्रम करणार. त्यानंतर अचानक माझी पोलीस सुरक्षा वाढवली. मी कारण विचारलं असता वरून इनपूट आल्याचं सांगण्यात आलं. मला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. त्यामुळे सुरक्षा वाढवली, असा खळबळजनक दावा यावेळी छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -