घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा वाऱ्यावर; तपासणी नाक्यावर फाटकच नाही

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमा वाऱ्यावर; तपासणी नाक्यावर फाटकच नाही

Subscribe

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमा वाऱ्यावर असल्याचे आढळून आले आहे. या सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी रामभरोसे आहे.

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकांवर बपेरा हे गाव असून या गावाला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. या ठिकाणी वनविभागाचे तपासणी नाका असूनही तपासणी फाटक नसल्याने कोणत्याच गाडीची तपासणी होत नसून अधिकाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

राज्यात येणाऱ्या वाहणांची तपासणी होत नाही

भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बपेरा हे गाव असून याच गावाला लागून महाराष्ट्र व मध्य प्रदेशची सीमा आहे. या सीमेवर वनविभाग व पोलीस चौकी बनविण्यात आली. मात्र मध्य प्रदेशमधून येणाऱ्या वाहनांची तपासणी करेल तरी कोण अशा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्याला कारणही तसेच आहे, या ठिकाणी वनविभाग तपासणी नाका तयार केला असून काही दिवस या नाक्यावर तपासणी सुद्धा करण्यात आली. मात्र, एक वर्षांपूर्वी तपासणी नाक्यावरील लोखंडाचा खांबाचा तुटला असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी याची रीतसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून मागील एक वर्षांपासून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप अधिकऱ्यांनी केला.

- Advertisement -

सीमेची जबाबदारी ही रामभरोसे

स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहनांना अडवायचं काय असाही सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर हि बाब वरिष्ठ अधिकऱ्यांच्या लक्षात असूनही याकडे काना डोळा केला जात आहे. या सीमेवरून मध्य प्रदेशमधून डुप्लिकेट दारू,चोरीची वाळू, लाकडे इतरही साहित्य महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यामुळे सीमेची जवाबदारी ही रामभरोसे असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा खुली असल्यामुळे अवैध काम करणा-यांना रान मोकाट आहे. त्यामुळे या तपासणी नाक्यावर वनविभागाने हेतू परस्पर बॅरीगेट लावले नाही काय, अशा सवाल या ठिकाणी स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – घरपोच दारुवरून उद्धव ठाकरेंनी सुनावले खडेबोल

शिक्षकच उठले विद्यार्थ्यांच्या जिवावर; पहिलीतील विद्यार्थ्याला जबर मारहाण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -