घरक्रीडाचाहत्याचे प्रेम आले उफाळून; धरले रोहितचे पाय

चाहत्याचे प्रेम आले उफाळून; धरले रोहितचे पाय

Subscribe

विजय हजारे चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा मुंबईकडून खेळत होता. या सामन्यात एका चाहत्याने मैदानात शिरून रोहितचे चक्क पायचं धरले.

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा मुंबईकडून विजय हजारे चषकात खेळत होता. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईचा बिहारशी सामना झाला. हा सामना मुंबईने सहजपणे जिंकला. पण या सामन्यात एका चाहत्याने मैदानात शिरून चक्क रोहितचे पायचं धरले. अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागत असल्यामुळे रोहित शर्मासारखे खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये फारसे खेळात नाहीत. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेआधी सराव करण्यासाठी रोहितने विजय हजारे चषकात खेळण्याचा निर्णय घेतला होता.

भारतीय खेळाडूंना जवळून पाहता यावे, त्यांच्यासोबत फोटो काढता यावेत यासाठी चाहते मैदानात घुसल्याची बरीच उदाहरणे आहे. काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक चाहता विराट कोहलीला मिठी मारण्यासाठी मैदानात घुसला होता. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -