घरमहाराष्ट्रप्रेयसीचा खून करुन प्रियकराने केली आत्महत्या

प्रेयसीचा खून करुन प्रियकराने केली आत्महत्या

Subscribe

पुण्यात प्रेयसीचा खून करुन प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सध्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच डोंबिवली येथे दोन मैत्रिणींनी एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर त्याच दिवशी कौटुंबिक वादातून एका डॉक्टर महिलेने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आपले आयुष्य संपवले होते. आत्महत्यांच्या घटनेत वाढत होत असतानाच पुण्यातील एका तरुणांने आपल्या प्रेयसीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अदिती बिडवे (१९) असे या तरुणीचे नाव असून नेईमोद्दीन शाह (२१) असे या तरुणाचे नाव आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील सांगवी येथे अदिती आणि नेईमोद्दीन शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झाले होते. हे मूळचे लातूरचे राहणारे असून या दोघांमध्ये प्रेमसंबध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अदिती ही सांगवी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. तर पुण्यात आपल्याला नोकरी मिळाली असे कुटुंबाना सांगून नेईमोद्दीन मंगळवारी सांगवीत पोहोचला. त्यावेळी अदितीच्या घरी कोणी नसल्याची माहिती मिळताच नेईमोद्दीन अदितीच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचला. त्यांनी अदितीचा खून केला आणि नंतर सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे दोघांच्या घरच्यांना धक्का बसला आहे. अदितीच्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याबाबत पुढील तपास करीत आहे.

- Advertisement -

वाचा – आठवीतल्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -