घरमहाराष्ट्रसोनसाखळी चोरी प्रकरणी सराईत चोरांना अटक; १६ तोळं सोनं जप्त

सोनसाखळी चोरी प्रकरणी सराईत चोरांना अटक; १६ तोळं सोनं जप्त

Subscribe

आरोपी महेश हा चोरी केलेले सोन्याचे दागिने आई मार्फत सराफाला विकत असे यामुळे त्याच्यावर संशय येत नव्हता.

सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांचे १६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. महेश तुकाराम माने वय-२१ आणि गणेश हनुमंत मोटे वय-२० असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. आरोपी महेश हा चोरी केलेले सोन्याचे दागिने आई मार्फत सराफाला विकत असे यामुळे त्याच्यावर संशय येत नव्हता.

असे पकडले चोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी अरुण नरळे यांना माहिती मिळाली की आरोपी महेश हा पिंपळे निलख येथे येणार आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे, अरुण नरळे यांच्या पथकाने तेथे जाऊन सापळा रचला. आरोपी महेश माने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली, तेव्हा आरोपी गणेश मोटे याचे नाव समोर आले. त्याच्या साथीने संबंधित गुन्हे केल्याचे आरोपी महेशने सांगितले.

- Advertisement -

…म्हणून चोरांवर संशय येत नव्हता

त्यांच्याकडून सोनसाखळीचे चोरीचे दहा तर दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघड झाले आहेत. ऐकूण ७ लाख रुपयांचे १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोघे संगनमत करून रात्रीच्या वेळेत सोनसाखळी चोरी करत होते. सोन्याचे दागिने दोन्ही आरोपींच्या घरी मिळाले असून काही सोने सोनारकडे मिळाले आहे. महेश हा त्याच्या आईला घेऊन सोनाराकडे चोरीचे सोने विकत असे. त्यामुळे सोनाराला संशय येत नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -