‘तारक मेहता का…’ मधील ही अभिनेत्री झाली आई!

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मालिकेला एवढी वर्ष झाली तरी मालिकेचा टीआरपी कमी झाली नाही. मालिकेत रीटा रिपोर्टरची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या प्रिया अहूजा राजदाने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रिया आई झाली असून तिने मुलाला जन्म दिला.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. प्रियाने आपल्या मुलाच्या पायाचा फोटोही शेअर केला आहे. प्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातावर तान्ह्या मुलाचे दोन पाय ठेवले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं की, ‘आमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आमचा आनंद गगनात मावत नाहीये.’ २७ नोव्हेंबरला प्रियाने मुलाला जन्म दिला.

प्रियासोबतच तिच्या नवऱ्यानेही इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलाचा फोटो शेअर केला. या फोटोत मुलाने वडिलांचं बोट पकडलेलं दिसतं.

प्रियाने याआधीही बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटोही चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. या आधी ‘तारक मेहता का…’ मधील दयाबेन ही देखील गेल्या वर्षी आई झाली होती. लवकर दयाबेन मालिकेत परत येत आहे.