घरमहाराष्ट्रशिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Subscribe

विकास कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली असल्याने सत्ताधारी काँग्रेससह शिवसेनेचे ९० टक्के आमदार नाराज असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते भारतीय जनता पार्टीच्या मुंबई कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेसाठी तीनही पक्ष एकत्र आले. परंतु त्यांच्यातील अंतर्गत वाद अजून कायम आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची कामे खोळंबली असल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण असल्याचे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत १०० जागा निवडून येतील असा अंदाज याच नाराजीच्या भरवशावर जाहीर केला. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांची नाराजीच त्यांना फायद्याची ठरणार हे राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेतृत्वाला माहिती असल्याचा टोला देखील. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

- Advertisement -

नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशनात जाहीर झालेला अर्थसंकल्प केवळ कमिशन लाटण्याच्या हेतूने बनविण्यात आला असून, त्याचा सामान्यांना जराही फायदा नसल्याचे आ. बावनकुळे म्हणाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थसंकल्पातही स्वतःच्या पक्षातील आमदारांना खुश ठेवल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -