घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Subscribe

जोपर्यंत मी प्रदेशाध्यक्ष आहे, तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशासाठी जमलेल्या शिंदे गटातील आणि भाजप नेत्यांमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. यासंदर्भातील चर्चांना उधाण आल्याने अखेर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिंदेंना जितके दिवस मुख्यमंत्रीपदावर राहायचे असेल तेवढ्या दिवस राहू दे. सरतेशेवटी आपल्या राष्ट्राचा विकास व्हायला हवा, असे मुनगंटीवार म्हणाले.

पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जो जो समाज फडणवीस यांच्याकडे गेला, त्या समाजावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे. फक्त मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी नाही तर महाराष्ट्राचे भवितव्य हे देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात, असेही बावनकुळेंनी सांगितले.

- Advertisement -

फडणवीस हे जातीपातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की २०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत, असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी उपस्थितांकडून मुख्यमंत्री असे वदवून घेतले.

बावनकुळेंना शिंदेंचे नेतृत्व मान्य नाही

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये दाखल झाले असताना बावनकुळेंचे हे वक्तव्य आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य नाही. भाजप एकनाथ शिंदे यांना कवडीचीही किंमत देत नाही. याचा विचार शिंदे गट आणि महाराष्ट्राने केला पाहिजे. लवकरच शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करून सत्तारूढ होण्यासाठी ते आसुसलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -