घरमहाराष्ट्रचंद्रशेखर बावनकुळ्यांचा ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच... ठाकरे गटाची बोचरी टीका

चंद्रशेखर बावनकुळ्यांचा ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच… ठाकरे गटाची बोचरी टीका

Subscribe

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ्यांचा एक ‘बावनपत्ती’ फोटो समाजमाध्यमांवर झळकताच भाजपाच्या गोटात छाती पिटण्याचा हुकमी कार्यक्रम सुरू झाला. तो अद्याप संपलेला नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे हे अध्यक्ष सध्या चीनचा प्रदेश ‘मकाऊ’ येथे सहकुटुंब असल्याचे प्रदेश भाजपाने जाहीर केले. ‘कुळे’ हे त्यांच्या कुटुंबासोबत कोठे असावेत, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. पण कुळे हे मकाऊच्या एका हॉटेलातील ‘कॅसिनो’मध्ये मस्त बसून द्युत खेळात दंग असल्याचे हे छायाचित्र मनोरंजक आहे, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – BJP ने बदलले सोशल मीडिया अकाउंटचे बॅकग्राऊंड पोस्टर; राम मंदिर लोकार्पण तारखेसह नवा फोटो

- Advertisement -

कुळे यांच्या टेबलवर ‘पोकर्स’ नामक जुगारात खेळले जाणारे चलन विखुरले आहे व त्यांना त्यांच्या चिनी मार्गदर्शक कुटुंबाने घेरले आहे. कुळे यांनी त्या खेळात त्या क्षणी किती ‘आकडा’ लावला आहे, तो त्यांच्या टेबलावरील स्क्रीनवर झळकला आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे छायाचित्र प्रसिद्ध होताच भाजपास इतके हडबडून जायचे कारण नव्हते. ‘छे, छे! आमचे प्रदेशाध्यक्ष बसले आहेत तो जुगाराचा अड्डा नव्हेच. ते तर त्यांच्या कुटुंबासह मकाऊ नगरीत पर्यटनास व श्रमपरिहारास गेले आहेत.’ त्यानंतर कुळे यांनी स्वतः केलेला खुलासा तर बुडत्याचा पाय खोलात अशा पद्धतीचा आहे. ‘छे, छे! माझा आणि त्या जुगाराच्या हॉलचा संबंध नाही. मी तर ते एक रेस्टॉरंट समजून खाण्यापिण्यासाठी गेलो.’ त्या छायाचित्राचा इतका धसका घेण्याचे व त्यानंतर आव्हान-प्रतिआव्हान देण्यासाठी नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय? असे सांगत ठाकरे गटाने अप्रत्यक्षपणे भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shivsena MLA Disqualification: उद्धव ठाकरे गटाचा पक्षादेश बनावट, शिंदे गटाचा सुनावणीवेळी मोठा दावा

कुळ्यांच्या जागी भाजपाविरोधी एखादा नेता असता तर अशा फोटोवरून फडणवीसांपासून बावनकुळ्यांपर्यंत सगळ्यांनी एकजात नैतिकता, संस्कृती बुडाल्याचा छातीठोक तोफखानाच सोडला असता व संबंधित चित्रातील महनीय व्यक्तीवर ईडी, सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून चौकशी पूर्ण होण्याआधीच बदनामीच्या फासावर लटकवून हे लोक मोकळे झाले असते, असाही हल्लाबोल ठाकरे गटाने या अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -