घरमहाराष्ट्र...म्हणून अजितदादांची केविलवाणी धडपड सुरु आहे; बावनकुळेंचा खोचक टोला

…म्हणून अजितदादांची केविलवाणी धडपड सुरु आहे; बावनकुळेंचा खोचक टोला

Subscribe

99 टक्के प्रकरणात गुन्हा घडल्याच्या 24 तासांत कारवाई महाराष्ट्रात केली गेली. त्यासाठी मी राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत अशातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला संवेदनशील गृहमंत्री लाभले आहेत. घटना घडली की तातडीने कारवाई केली जात आहे. तुमचं सरकार होतं तेव्हा कारवाईच होत नव्हती असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना टोला लगावला.

याच संदर्भांत बावनकुळे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी एका व्यक्तीला बंगल्यात घेऊन मारले. जर लिस्ट काढली तर असे अनेक गुन्हे समोर येतील ज्यात पुरावे समोर असून महाविकास विकास आघाडीच्या सरकारकडून कोणत्याच प्रकारची कारवाई केली गेली नाही. महाराष्ट्रात मागील तीन महिन्यात जेवढ्या घटना घडल्या त्यावर तातडीने कारवाई राज्यातील सरकार करून करण्यात आली. 99 टक्के प्रकरणात गुन्हा घडल्याच्या 24 तासांत कारवाई महाराष्ट्रात केली गेली. त्यासाठी मी राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो. असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

- Advertisement -

अजित परिवारांची केविलवाणी धडपड
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. त्यावेळी बावनकुळे म्हणाले; अजित पवार अस्वस्थतेमध्ये बोलत आहेत. अजित पवार विरोधीपक्षनेते आहेत आणि त्याच अधिकाराचा वापर करून सरकारवर आरोप करण्याची केविलवाणी धडपड करत आहेत असं बनवकुळे म्हणाले.

मविआ सरकारवर निशाणा
शिंदे – फडणवीस सरकारच्या बैठकी होत नाहीत असे अजित पवार म्हणाले त्यावेळी बावनकुळे म्हणाले, मागील अडीच वर्षांमध्ये जेवढे निणर्य घेतेले गेले नाहीत तेवढे निर्णय मागील तीन महिन्यांमध्ये शिंदे – फडणवीस यांच्या काळात घेतले गेले. असं म्हणत बावनकुळे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला. त्याचबरोबर मविआ सरकार असताना सर्व बैठकी व्हर्चुअल पद्धतीने होत होत्या. असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. त्याचसोबत महाराष्ट्र राज्याला देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी जे करणे शक्य आहे ते सर्व शिंदे – फडणवीस सरकार करत आहे. असंही बावनकुळे म्हणाले. त्यामुळे ज्या आरोपात तथ्य नाही असे आरोप अजित पवारांनी करू नयेत असे बावनकुळे म्हणाले. त्यासोबत अडीच वर्षांमध्ये सरकार केवळ आकसाने वागले असेही बावनकुळे म्हणाले. विनयभंग करणाऱ्याला तुम्ही संरक्षण दिलं आहे असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – नाशिकमध्ये चाललंय काय? पाच वर्षांत दहा हजार घटस्फोट, दिवसाला येतात दहा अर्ज

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -