घरताज्या घडामोडीनवाब मलिकांबाबत राज्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी दाऊद कनेक्शन, छगन भुजबळांचा भाजपवर निशाणा

नवाब मलिकांबाबत राज्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी दाऊद कनेक्शन, छगन भुजबळांचा भाजपवर निशाणा

Subscribe

पोलीस कोठडी नंतर मग जामीनसाठी प्रयत्न करण्याबात विचार सुरु आहे. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील आणि याचा निषेध करुन नवाब मलिकांना समर्थन देतील. असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. नवाब मलिकांना दाऊदशी संबंध आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. परंतु नवाब मलिकांच्या प्रकरणात राज्यात आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी दाऊदचे कनेक्शन दाखवण्यात आले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या अटकेचा निषेध करण्यात येणार असून तसेच नवाब मलिकांच्या समर्थनासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी भुजबळ म्हणाले की, एलबीएस मार्गालगत असलेली जमीन मुनीराची आहे. त्या मालमत्तेवर अतिक्रमण केले होते. या मालमत्तेमध्ये मंत्री नवाब मलिक यांचे एक दुकान आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी सलीम पटेलकडे पॉवर ऑफ अॅटॉर्नी देण्यात आली होती. पटेल तिथलाच होता आणि त्याचा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नाही. तो मालमत्ता विकत होता दरम्यान नवाब मलिकांचे दुकान त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी मालमत्ता विकत घेतली. यामुळे मुनीराने त्या सलीम पटेलविरोधात तक्रार करायला हवी होती की, सलीम पटेलने माझी जमीन विकली आणि पैसे दिले नाही. यामध्ये कुठेही दाऊदचे प्रकरण येत नाही. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी दाऊदचे नाव घेण्यात येत आहे. तिथल्या स्थानिकांमधला व्यवहार आहे. त्यामध्ये कोणी बरोबर आणि चूक असेल एवढाच मुद्दा आहे. दाऊदचे नाव घेऊन एक प्रकारचे चित्र उभ करुन एखाद्या मंत्र्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. छगन भुजबळ म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुस्लिम आहे म्हणून फक्त संबंध लावयचा का? असे करोडो मुस्लिम आपल्या आजुबाजूला राहत असतात. त्यांचेसुद्धा व्यवहार करोडो रुपयांचे होत असतात म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध आहे असे बोलू शकत नाही. नवाब मलिकांना सेशन कोर्टाने ८ दिवसांची ईडी कोठडी दिली असली तरी त्यापूर्वीच कोठडी संपवता येईल का? या विषयावर विचार सुरु आहे. त्यांना पोलीस कोठडी नंतर मग जामीनसाठी प्रयत्न करण्याबात विचार सुरु आहे. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील आणि याचा निषेध करुन नवाब मलिकांना समर्थन देतील. असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : कोरोनातही रेल्वेने तिकिटाचे पैसे मागितले, आदित्य ठाकरेंचे पंतप्रधानांच्या आरोपाला प्रत्यूत्तर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -