घरमहाराष्ट्रमराठवाडाChhatrapati Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घातले साकडे

Chhatrapati Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी अंबादास दानवेंनी राज्य सरकारला घातले साकडे

Subscribe

छत्रपती संभाजीनगरमधील नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडण्यासाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसताना दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडण्यासाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे. दानवेंनी पिण्याची पाण्याची आणि जनावराच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नांदूर-मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात पाणी सोडण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. (Ambadas Danve requested the state government for drinking water in Chhatrapati Sambhajinagar)

अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे म्हटले की, राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. उक्त तालुक्यात प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु पुरवठा अत्यल्प स्वरूपाचा असल्याने या तालुक्यातील नागरिकांना व जनावरांना पाण्याअभावी अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी व अनेक सामाजिक संस्थांकडून प्रशासनाकडे नांदुर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात एक आवर्तन मिळण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  Politics : फडणवीसांची भेट अन् निंबाळकरांना पाठिंबा जाहीर करताच कारखान्याचं सील निघालं!

- Advertisement -

प्रशासनाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याची बाब निदर्शनास आल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, नागरिकांमध्ये शासनाप्रती असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून उक्त प्रकरणी चौकशी करून संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली पाणी टंचाई सोडविण्याच्या दृष्टीने नांदुर मधमेश्वर एक्सप्रेस कालव्यात एक आवर्तन सोडण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : शुभ बोल रे नाऱ्या; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर साधला निशाणा

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -