घरमहाराष्ट्रकोकणUddhav Thackeray : शुभ बोल रे नाऱ्या; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर साधला...

Uddhav Thackeray : शुभ बोल रे नाऱ्या; उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर साधला निशाणा

Subscribe

कणकवली मतदारसंघात प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर साधला निशाणा.

कणकवली : लोकसभा निवडणुकीतील पहिले दोन टप्पे पार पडले असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रचार सभाचा धडाका सुरू आहे. मात्र या सगळ्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ चर्चेत आहे. कारण याठिकाणी महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी कणकवली मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray targets Narayan Rane)

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर मला कोणीतरी धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे, त्या म्हणी मी केल्या नाहीत किंवा तुम्ही केल्या नाहीत. पण एक म्हण अशी आहे की, शुभ बोल रे नाऱ्या. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाले. पण मी आता येऊन उभा आहे. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन तीन वेळेस तुम्हाला इकडे येऊन आडवा केलं. माझ्या घराच्या इकडे आलात तिथे तुम्हाला साफ करून टाकलं. पण जराही लाज नाही, फक्त बडबड करायची, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता केली.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : फडणवीसांची भेट अन् निंबाळकरांना पाठिंबा जाहीर करताच कारखान्याचं सील निघालं!

भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चार दिवसांपूर्वी येऊन गेलो होतो, तेव्हा बेअकली जनता पक्षाचे नेते आपल्याला नकली म्हणाले. शिवसेनेला नकली म्हणणारे बेअकली नाहीतर दुसरे काय असणार? आजपर्यंत त्यांना मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो. कमळाबाई म्हणत होतो आणि आता बेअकली म्हणतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हणा नाहीतर तुमची जिभ सरळ करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला.

- Advertisement -

एका बाजूला विनायक आणि दुसऱ्या बाजूला खलनायक

उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह आम्हाला विचारतात, अयोध्येत राम मंदिरात दर्शनासाठी का गेले नाही, मग तुम्ही तुळजाभवानी मंदिरात का नाही गेलात? मी काळाराम मंदिरात गेलो होतो, त्याचं महत्त्व माहीत आहे का? बाबासाहेब आंबेडकर हे काळाराम मंदिरात गेले होते. त्यावेळी तुमच्यासारख्या बुरसटलेल्या लोकांनी त्यांना रोखले. मी सावरकारांवर विधानसभेत बोललो आहे. मग शामा प्रसाद मुखर्जीबद्दल भाजपा नेते का बोलत नाही? ते मुस्लिम लीगसोबत गेले होते ना? भाजपाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांबद्दल मला आजही आस्था आहे. एका बाजूला विनायक आणि दुसऱ्या बाजूला खलनायक अशी परिस्थिती असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतील सभेत लगावला.

हेही वाचा – MNS Avinash Jadhav : हा माझ्या बदनामीचा कट…, खंडणीप्रकरणी अविनाश जाधवांचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -