घरमहाराष्ट्रChiplun floods : चिपळूणमध्ये दीड हजार पूरग्रस्तांची सुखरूप सुटका, मदत कार्य वेगात

Chiplun floods : चिपळूणमध्ये दीड हजार पूरग्रस्तांची सुखरूप सुटका, मदत कार्य वेगात

Subscribe

चिपळूणमध्ये तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. यात अनेक नदी, नाल्यांना महापूर आल्याने घरच्या घरं पाण्याखाली गेलीत. चिपळूणमध्ये सध्या भारतीय वायू दलाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे. आत्ता महापूरात अडकलेल्या सुमारे दीड हजार पूरग्रस्त नागरिकांची शुक्रवारी दिवसभरात सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली 

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील अनेक शहरात गुरुवारी पहाटेपासून पाण्याची पातळी वाढू लागली. यामुळे सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेली. यापूर्वी झालेल्या महापूराचा अनुभव पाहता नागरिकांनी पाणी जसे वाढत गेले तसे सर्व सामान वरील मजल्यावर हलवले. मात्र पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंतही पोहचले. यामुळे शहरात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र परिस्थितीचा अंदाज न आल्याने असंख्य नागरिक आपापल्या घरात आणि दुकानांमध्ये अडकून पडले आहेत.

- Advertisement -

आता रेस्क्यू ऑपरेशनला वेग

यात नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. पण या टीमला पुण्याहून चिपळूनमध्ये पोहचण्यासाठी उशिर झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरु झाले. यात स्थानिक नागरिकही आपल्या परीने सर्व नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अधिक मेहनत घेत आहेत. हवाई दल आणि रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरची मदत मिळाल्याने आता रेस्क्यू ऑपरेशनला वेग आला आहे.

दिवसभरात शहराच्या विविध भागांमधून सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. त्यापैकी निवाऱ्याची काहीच सोय नसलेल्या १५५ जणांची चिपळूणमध्ये, तर आणखी १५० जणांची खेडमध्ये व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच सुमारे ५ हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी ओसरल्यानंतर शुक्रवारी पुरात वाहून आलेले साहित्य, चिखल, राडारोडा साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर अनेक नागरिकांना विविध स्तरातून आलेली मदत पोहचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.

- Advertisement -

चिपळूनमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

पुराचे पाणी सध्याओसरले असले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे चिपळूण शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अजूनही संपर्क तुटलेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी वायूदल व नौदलाच्या सहाय्याने मदत कार्य करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी हे काम पुढे चालू राहणार आहे.


Video : गोव्यात दरड कोसळल्याने ट्रेन ढिगाऱ्याखाली

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -