घरमनोरंजन'सिनेमा ही भारताची सॉफ्ट पॉवर'; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भारतीय चित्रपट...

‘सिनेमा ही भारताची सॉफ्ट पॉवर’; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला भेट

Subscribe

मुंबईतील भारतीय चित्रपट संग्रहालया केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी "एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय हा आपल्या देशाचा समृद्ध वारसा आहे'', अशा शब्दात भारतीय चित्रपट संग्रहालयाविषयी गौरवोद्गार काढले.

मुंबईतील भारतीय चित्रपट संग्रहालया केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी “एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय हा आपल्या देशाचा समृद्ध वारसा आहे”, अशा शब्दात भारतीय चित्रपट संग्रहालयाविषयी गौरवोद्गार काढले. तसंच, “सिनेमा ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे, जी जगभरातील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करते”, असंही त्यांनी म्हटलं. ‘मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांनी जगामध्ये भारताची ओळख निर्माण केली आहे’, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातील विविध विभागांना भेट दिली तर गेल्या शंभर वर्षातील चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि तंत्रज्ञानात झालेले बदल पाहायला मिळतील असे सांगत ठाकूर यांनी मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या संग्रहालयाला भेट द्यावी असे आवाहन केले. विशेषत: भारतीय चित्रपटांमध्ये स्वारस्य असलेल्यांनी राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला भेट द्यायलाच हवी, असेही त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

एकीकडे, आठ एकरवर पसरलेल्या गुलशन महल या इमारतीत विविध आकाराच्या आठ खोल्यांत असलेले प्रदर्शन, मूक चित्रपटांपासून ते नव्या चित्रपटांपर्यंतच्या इतिहासाचा वेध घेते तर, दुसरीकडे नव्या संग्रहालय इमारतीत बहुतांश संवादात्मक प्रदर्शन आहे. चित्रपटात वापरलेल्या वस्तू, जुनी उपकरणे, पोस्टर्स, महत्वाच्या चित्रपटांच्या प्रति, प्रसिद्धी पत्रके, ध्वनीफिती, ट्रेलर्स, ट्रान्सपरन्सी, जुनी चित्रपट मासिके, चित्रपट निर्मिती आणि वितरणाविषयीची माहिती व्यवस्थितपणे प्रदर्शित करण्यात आली आहे, ज्यात भारतीय चित्रपटांचा इतिहास क्रमवार प्रदर्शित करण्यात आला आहे.

दरम्यान या ठिकाणी भेट दिल्यास हे संग्रालय आपल्याला तीन-चार तासांत संग्रहालय तुम्हाला 100 वर्षे जुन्या इतिहासात घेऊन जाईल, जेव्हा कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञान किंवा उपकरणांशिवाय चित्रपट बनवला जात होता, असे ते म्हणाले. हे संग्रहालय प्रेक्षकांना, चित्रपट पहिल्यांदा बनला होता त्या काळात म्हणजे 100 वर्षांआधी ते आतापर्यंतचा प्रदीर्घ पट उलगडून दाखवते, असे ते म्हणाले. जगातील सर्वाधिक चित्रपट भारतात बनवले जातात असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – खार येथील इमारतीला भीषण आग; चार जणांना धुराची बाधा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -