घरताज्या घडामोडीकामातच चुका होत्या.., नाशिक-मुंबई महामार्गावरून भुजबळ आणि गडकरींमध्ये जुंपली

कामातच चुका होत्या.., नाशिक-मुंबई महामार्गावरून भुजबळ आणि गडकरींमध्ये जुंपली

Subscribe

नाशिक-मुंबई महामार्गाच्या बांधकामावरून माजी मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात जुंपली आहे. नितीन गडकरी यांनी महामार्ग काँक्रेटीकरण करण्याची घोषणा केली तरीही रस्ता झाला नाही, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, भुजबळांच्या काळात झालेल्या कामातच चुका होत्या. आधीच मोठा रस्ता केला असता, तर हि वेळ आलीच नसती, असं नितीन गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इगतपुरी येथे सातहून अधिक रस्त्यांच्या कामाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, नाशिक-मुंबई महामार्गाचे बांधकाम हे भुजबळ सार्वजनिक मंत्री असताना पूर्ण झाले. परंतु रस्त्याच्या डिझायनमध्ये अनेक चुका होत्या. तेव्हाच रस्ता सहा लेनचा केला असता तर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली नसती, असं नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

नाशिक-मुंबई महामार्गाला इंदिरानगर आणि राणेनगर परिसरात अंडरपास आहे, मात्र अंडरपासला लागून असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीपेक्षा अंडरपास छोटा आहे. मुंबई आणि नाशिककडून येणाऱ्या वाहनासाठी अंडरपासच्या तोंडावरच रॅम्प असल्यानं दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होते.

इंदिरानगर पासून केलेल्या बोगद्यात वाहतूक समस्या अंडरपास, रस्त्याची एकूण परिस्थिती काय आहे, हे लक्षात येईल. यासह द्वारका सर्कल ते नाशिकरोड या सहा किलोमीटरच्या रस्त्यावर नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपूल बांधणे आणि मेट्रोच्या कामाला गती देण्याचे आश्वासनही गडकरींनी दिल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात नाशिकला मोठे प्रकल्प सुरु करण्याचे संकेत गडकरी यांनी दिले आहेत.

- Advertisement -

गडकरींनी मुंबई-नाशिक असा कारने प्रवास करावा अन्यथा जाताना हेलिकॉप्टरमधून रस्त्याची पाहणी करावी, असं छगन भुजबळ म्हणाले होते. यूपीआयच्या काळात ज्यावेळी नाशिक-मुंबई महामार्गाचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी पुढील काही वर्षांत दोन्ही बाजूने एक एक लेन वाढविण्यात येईल, नंतर वेळोवेळी डागडुजी होईल, असा आराखडा तयार करण्यात आला. मात्र, तसं झालं नसल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहचल्या विधानभवनात; मुख्यमंत्र्यांनी केले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -