घरगणेशोत्सव 2023कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत हाणामारी; तीन जण जखमी

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत हाणामारी; तीन जण जखमी

Subscribe

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणूकमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि हाणामारी झाल्याचा प्रकार झाला आहे. या मंडळांमध्ये बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुख्य मार्गात आधी प्रवेश करण्यावरून हा वाद झाला होता. यानंतर हाणामारी आणि दगफेकही झाली. या घटनेत तीन गणेशभक्त जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी पोलिसांनी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवल्यामुळे अनर्थ टाळला असून यामुळे खरी कॉर्नर परिसरात तणवाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत वेळेत प्रवेश मिळावा. यासाठी काही गणेश मंडळ हे रात्रीच ट्रॅक्टर-ट्रॉली देखावा सजावटीचे साहित्य घेऊन मिरवणूक मार्गाला सुरुवात केली होते. पण दांडगाईवाड येथील एक मंडळाची ट्रॉली आणि कार्यकर्ते हे खरी कॉर्नरकडून मुख्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या मंडळाने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंडळा थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही मंडळात वाद झाला आणि वादाचे रुपांतर हे हाणामारीत झाले. यानंतर दगडफेड केली. यावेळी देखावा पाहाण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि लोक हे इकडे-तिकडे धावू लागेल. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केली आणि कार्यकर्त्यांना पांगवले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील गपणती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त; लालबाग-परळमध्ये अशी आहे व्यवस्था

जुना राजवाडा पोलिसात नोंद

यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण काही कार्यकर्ते हे वाद घाल होते. यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात जखमी झालेल्या तीन जणांना रुग्णालयात नेहण्यात आले. या घटनेची जुना राजवाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -