घरगणेशोत्सव 2023मुंबईतील गपणती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त; लालबाग-परळमध्ये अशी आहे व्यवस्था

मुंबईतील गपणती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त; लालबाग-परळमध्ये अशी आहे व्यवस्था

Subscribe

मुंबई : गणपती बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज निरोप देण्यात येणार आहे. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जनचा उत्साहा पाहाण्यासाठी हजारोच्या संख्येने गणेशभक्त गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त मुंबईमध्ये होमगार्ड, पोलीस मित्र आणि विविध स्वयंसेवी संस्था यांची देखील मुंबई पोलिसांना मदत करणार आहेत.

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्त हे लाखोच्या संख्येत गर्दी करतात. यामुळे मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त असणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांकडून 8 अप्पर पोलीस आयुक्त, 25पोलीस उपायुक्त, 45सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2866 पोलीस अधिकारी आणि 16, 258 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याबरोबरच 35 एसआरपीएफ पलटन, दंगल नियंत्रण पथक, क्यूआरटी पथक आणि होमगार्डस हे देखील मुंबईतील विसर्जन मिरवणुकीत तैनात करण्यात आले आहे. मुंबईतील दादर, जुहू, गिरगांव, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळाव्यतिरिक्त 160हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गणपती विसर्जन : भाविकांसाठी मध्य रेल्वेकडून 10 विशेष लोकल ट्रेनची व्यवस्था

लालबाग-परळमध्ये अशी असणार सुरक्षा

लालबाग-परळ परिसरात विसर्जन मिरवणुकीसाठी 300 सिसीटीव्ही लावण्यात आले आहे. महिला सुरक्षेकरता 6 छेडछाडविरोधी पथक, मोबाईल चोरी करता 6 विशेष पथके, एटीएस – आतंकवादी कारवाया रोखण्याकरता, 3 बॉम्ब शोधक नाशक पथके, रॅपीड अॅक्शन फोर्सची नियुक्ती, 5 एसआरपीएफची पथके, 3 दंगलनियंत्रक पथके, 3 सिसीटीव्ही व्हॅन, 2500 पोल्स मित्र कार्यकर्ते, 6 वॉच टॉवर्स अशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -