घरमहाराष्ट्रउद्योग स्नेही धोरणामुळे राज्याला फायदा - मुख्यमंत्री

उद्योग स्नेही धोरणामुळे राज्याला फायदा – मुख्यमंत्री

Subscribe

'महाराष्ट्राचे उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यांत सुधारणा केल्याने राज्याच्या परकीय गुंतवणुकीत वाढ होत असून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४९ टक्के गुंतवणूक राज्यात झाली आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

‘महाराष्ट्राचे उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यांत सुधारणा केल्याने राज्याच्या परकीय गुंतवणुकीत वाढ होत असून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४९ टक्के गुंतवणूक राज्यात झाली आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत मायडिया टेक्नोलॉजी पार्कच्या कोनशिला अनावरण समारंभ प्रसंगी बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘मायडिया टेक्नोलॉजी पार्कमुळे सुपा आणि पारनेर क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या भागात औद्योगिक विकासासाठी आवश्यक कुशल आणि क्षमतेने काम करणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे.’

चायनिज क्लस्टर विकसित करण्यावर भर

चीनच्या उद्योगांना राज्यात आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे चायनिज क्लस्टर विकसित करण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यात परदेशातील उद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रीय उद्योगात महाराष्ट्राचे योगदान जास्त

औद्योगिक सुधारणांमुळे महाराष्ट्र परकीय उद्योजकांचे आवडीचे ठिकाण बनल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने १४२ वरून ७७व्या स्थानावर झेप घेतली आहे. हे आजवरचे सर्वोच्च स्थान असून यात महाराष्ट्राचे योगदान अधिक आहे. या धोरणांतर्गत उद्योगांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक परकीय गुंतवणूक राज्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘मायडिया उद्योग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली’ याबद्दल त्यांचे आभार मानले. या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराची उपलब्धता होणार आहे. चीन आणि जपानसारख्या देशांनी राज्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. इतर देशही गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -